आॅनलाईन सुनावणी साठी एक बेंच वाढवला, अति महत्वाची प्रकरणे हाताळण्याचे आदेश

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मुंबई, गोवा,नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठातील आॅनलाईन सुनावणीसाठी प्रत्येक  ठिकाणी एक बेंच वाढवण्याचा निर्णय व्हिडीओ काॅन्फरंन्सद्वारे मुख्य न्यायाधिश दिपांकर दत्ता यांनी दिला.
आज दुपारी मुंबई उच्चन्यायालयातील तीन प्रमुख न्यायमूर्ती, सर्व खंडपीठातील मुख्यन्यायमूर्ती, प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश,व बार कौन्सिल चे सदस्य यांची आज आॅनलाईन मिटींग मुख्य न्यायमूर्तींनी बोलावली होती. त्यामधे प्रत्येक खंडपीठ आणि जिल्हा न्यायालयात आॅनलाईन सुनावणीसाठी एक बेंच वाढवण्यात आल्याचे ठरले.तसेच जिल्हान्यायालयांनी ८ जून पर्यंत अतिमहत्वाचे जामिन अर्ज निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच पूर्णवेळ पूर्णवेळ कोर्ट राज्यात सुरु करण्यासंदर्भात येत्या १५ जून रोजी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.या बैठकीसाठी अॅड.सुभाष घाडगे, अॅड. उदय वारुंजीकर,अॅ.मोतीसिंग मोहटा यांची उपस्थिती हौती.

Advertisements

आपलं सरकार