Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MubaiSadNews : साजिद -वाजिद जोडीतील वाजिदखान यांना कोरोनाने हिरावले …. सिने जगतात हळहळ !!

Spread the love

बॉलिवूडचे एव्हरग्रीन संगीतकार साजिद-वाजिद यांच्या जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ४२ वर्षांचे होते. वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.

दरम्यान कोरोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्रा, सोनू निगम, शंकर महादेवन, वरूण धवन, सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनी ट्विटरच्या माध्यमातून वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं ‘हिट कॉम्बिनेशन’ होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.

साजिद -वाजिद यांनी ‘दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘वीर’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘पार्टनर’ , ‘एक था टायगर’, दबंग २’, ‘दबंग ३’, ‘पार्टनर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रावडी राठोड’, ‘हाउसफुल २’ यासह सलमानच्या विविध चित्रपटांना संगीत तर दिलेच होते पण वाजिद खान यांनी सलमानसाठी  गाणीही गायली होती. साजिद-वाजिद जोडगोळीचा नेहमीच बॉलिवूडमध्ये दबदबा राहिला. टीव्हीवरील प्रसिद्ध ‘सारेगमप २०१२’, ‘सारेगमप सिंगिंग सुपरस्टार’ शोसाठी या जोडीने परीक्षक म्हणून काम पाहिले होते. आयपीएल-४ चं थीम सॉंग ‘धूम धूम धूम धडाका’ याच जोडगोळीने संगीतबद्ध केलं होतं. हे गाणं वाजिद यांनी गायलं होतं. वाजिद यांच्या निधनाने अनेक हिट गाणी देणाऱ्या साजिद-वाजिद या दोन भावांची ताटातूट झाली आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद शराफत अली खान हे त्यांचे वडील होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!