Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrime : शहरातील दोन गुन्ह्यात तीन आरोपींसह १० लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त

Spread the love

सिडको पोलिसांकडून जवाहरनगर पोलिसांचा गुन्हा उघडकीस,१०लाखांचा मुद्देमाल जप्त,एक अटक

औरंगाबाद – सिडको पोलिसांनी जवाहर नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा उघडकीस आणून १०लाखांचा मुद्देमाल जप्त करंत एका आरोपी सहित जवाहरनगर पोलिसांच्या हवाली केला. सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी हे कॅनाॅट प्लेस  परिसरातील मोबाईल चे दुकान फोडणार्‍या चोरट्यांचा शोध घेत होते. गुन्हेशाखेने या प्रकरणात दुसरेच आरोपी पकडून आणल्यानंतर सिडको पोलिसांनी गबर्‍या आणि मकळ्या या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांच्या गस्तीवर असतांना संशयावरुन मुस्तफा रबुल अन्सारी (२२) रा.झारखंड हल्ली मु.भारतनगर याची चौकशी केली असता त्याने मोबाईलचे नाही टि.व्ही.चे दुकान फोडले म्हणत ६ लाख २५ हजारांचे टिंव्हि. २ लाखांची अॅपे रिक्षा आणि चिकलठाणा पोलिस ठाण्षाच्या हद्दीत चोरी केलेली १लाख रु.किमतीची मोटरसायकल असा १० लाखांच्या मुद्देमालासह पकडले.

हा प्रकार पोलिस निरीक्षक गिरी यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिसउपनिरीक्षक भारत पाचोळे यांना सांगितला व चोरटा व मुद्देमाल जवाहरनगर पोलिसांच्या हवाली केले.पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील व एपीआय श्रध्दा वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय टाक करंत आहेत.वरील कारवाईत सिडको पोलिस ठाण्याचे पीएसआय बाळासाहेब आहेर,पोलिस कर्मचारी राजेश बनकर,नरसिंग पवार, सुरेश भिसे, किशोर गाडे, यांनी सहभाग घेतला होता.

दोन दरोडेखोर मुद्देमालासहित जेरबंद, दोन गुन्ह्यांची दिली कबुली

औरंगाबाद – एक आठवड्यापूर्वी कार मधील दांपत्याचे दागिने हिसकावणे आणि टेंपो चालकाला मारहाण करंत लुबाडणारे तिघांपैकी दोघांना सिडको औद्योगिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांच्या ताब्यातून ८३ हजार ८०० रु.चा मुद्देमाल जप्त केला.
लहू उर्फ झगल्या चव्हाण आणि विशाल उर्फ खंड्या जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा किशोर पवार नावाचा साथीदार न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लहू उर्फ झगल्या आणि विशाल हे दोन्ही आरोपी केंब्रीज चौक परिसरात येणार असल्याची माहिती खबर्‍याने पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांना दिली होती.त्यानुसार पीएसआय सुरेश जारवाल यांना निरीक्षक पोटे यांनी आदेश दिल्यानंतर वरील गुन्हेगारांना अटक करण्षात आली. या किरवाई सिडको औद्योगिच पोलिस ठाण्याचे कर्मचारी मुनीर पठाण, शाहैद शेख, सुंदर्डे, दिपक शिंदे यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!