Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCoronaEffect : धक्कादायक : उपचारांनंतर घरी आलेल्या पोलीसाचा अवघ्या चार तासात मृत्यू झाल्याने खळबळ

Spread the love

मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दीपक हाटे (५२) हे कोरोना पॉझिटिव्ह होते. कोव्हिड सेंटरमध्ये १० दिवसांचा उचपार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. कॉलनीतल्या नागरिकांना दीपक हाटे यांचं टाळ्या वाजवून स्वागतही केलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या ४ तासांत दीपक हाटे यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. दीपक हाटे हे वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. धक्कादायक म्हणजे पोलीस हवालदार दीपक हाटे यांचंही कोरोनाच्या उपचारानंतर निधन झालं आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढतच आहे. राज्यातील आणखी ११४ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल २३२५ वर पोहोचली आहे. दुर्दैवाने एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हा आकडा आता २६ वर पोहोचला आहे. दीपक हाटे हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. मुंबईत अडकलेल्या मजुरांना गावी पाठवण्यासाठी ज्या पोलिसांची ड्युटी होती, त्यामध्ये दीपक हाटे यांचाही समावेश होता. यानंतर काहीच दिवसात दीपक हाटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दीपक हाटे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना वरळीतील राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं.

दरम्यान कोव्हिड सेंटरमध्ये १० दिवसांचा उचपार घेतल्यानंतर  गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास हाटे हे वरळी पोलीस कॅम्पातील त्यांच्या घरी चालत आले.  विशेष म्हणजे हाटे हे घरी परतल्याने शेजाऱ्यांसह कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. हाटे यांनीही सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घरी गेले. मात्र रात्री १ च्या सुमारास हाटे यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेने नायर रुग्णालयात नेण्यात आलं.परंतु , तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दीपक हाटे हे चालत कसे काय आले? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला. हाटे आले तेव्हा यांची प्रकृती काहीशी ठिक नव्हती. तरीही त्यांना एका गाडीतून घरापासून लांब १ किमीवर का सोडण्यात आले ? तेथून ते चालतच घरापर्यंत कसे आले ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत परंतु या प्रश्नांना काहीही अर्थ नाही.

हाटे वरळी पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते. १८ मे ला त्यांची प्रकृती खालावली. करोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच त्यांना वरळीच्या वल्लभभाई स्टेडियम येथील केंद्रात दाखल केले गेले. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री   त्यांचा मृत्यू झाला. हाटे यांच्याबाबतची एक ध्वनिचित्रफीत शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. या चित्रफितीत हाटे अशक्त असल्याचे स्पष्टपणे दिसते, अशी माहिती एका पोलिसाने दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!