Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाचव्या लॉकडाऊनचा ट्रेलर जाहीर, पूर्ण सिनेमासाठी लोकांचे लक्ष आजच्या मोदींच्या “मन कि बात” कडे…

Spread the love

आज ३१ मे रोजी संपत असलेल्या चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा पाचवा टप्पा कसा असेल? सरकारकडून कुठल्या गोष्टींना सूट दिली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यातील रुपरेषेबाबत काही संकेत देताना या लॉकडाऊनचे केवळ ट्रेलर दाखविले असून प्रत्यक्ष लॉकडाऊन कसे राहील याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन कि बात मध्ये देतील असे सांगण्यात आहे.

एका वृत्तवाहिनीला प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा हा सामान्य असेल. यात फक्त काही भागांमध्येच सक्ती केली जाईल. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही ते भाग जनतेसाठी खुले केले जातील. आता जी स्थिती आहे ती बदलेल. नागरिकांना बऱ्याच अंशी सूट मिळालेली आहे आणि पुढच्या काळात सामान्यपणे जीवन सुरू होईल, असं प्रकाश जावडेकर म्हणाले. लॉकडाऊन घोषित करणं गरजेचं होतं. वेळेवर हा निर्णय घेतला गेला नसता तर आज देशात कोरोनाचे ५० लाखांहून अधिक रुग्ण राहिले असते. आताही देशात करोना रुग्णांची वाढती संख्याही कमी आहे. जगात करोनाने सर्वात कमी मृत्यू भारतात झाले आहेत. कोरोनावर लवकरच लस किंवा औषध येईल आणि आपले जीवन सामन्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यासाठी नवे दिशानिर्देश

केंद्र सरकार लॉकडाऊनच्या ५व्या टप्प्यासाठी नव्या दिशानिर्देशांवर काम करत आहे. यामुळे १ जूनपासून देशातील बहुतेक भागांमधील लॉकडाऊनमुळे असलेली बंदी उठेल. १३ शहरं सोडून इतर भागांमध्ये लॉकडाऊनची सक्ती हटवली जाऊ शकते, अशी माहिती मिळाल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी लॉकडाऊनच्या नव्या दिशानिर्देशांवर विचारविनिमय करण्यात आला. ३१ मेपासून पुढच्या १५ दिवसांपर्यंत लॉकडाऊनचे नवे दिशानिर्देश जारी होण्याची शक्यता आहे. हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट १ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. हॉटेल्स टप्प्याटप्प्याने उघडतील. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल. सध्या सेवा क्षेत्र पू्र्णपणे बंद आहे. करोनाविरोधी लढाई लढणारे पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच सध्या हॉटेल्स सुरू आहेत. यासोबतच १ जूनपासून बहुतेक सार्वजनिक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून मेट्रो सेवा सुरू करण्यालाही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!