Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोना संकट काळातही राज्य सरकारकडून आजपासून पेट्रोल -डिझेलच्या किमतीत किमान दोन रुपयाची वाढ

Spread the love

Maharashtra :  Petrol : 76.65 Rs/L | Diesel : 66.06 Rs/L

महाविकास आघाडीच्या वतीने मार्च महिन्यात अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात हरित निधी उभा करण्यासाठी राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया अतिरिक्त अधिभार लावण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. त्यामुळे एप्रिलपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल एक रुपयांनी महागले. आता राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करावरील (VAT) अधिभारात वाढ केली आहे. त्यामुळे रविवार ३१ मेच्या मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल डिझेल दोन रुपयांनी महागणार आहे.

सरकारच्या युक्तिवादानुसार जागतिक तापमान वाढ हा सध्या जगापुढील सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी हरित निधी उभा करण्याचे सरकारने ठरविले आहे. या निधीसाठी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त अधिभाराच्या स्वरुपात वसूल करण्यात येणार आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किमान दोन रुपयाने वाढणार आहेत.

दरम्यान इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार मुंबईत शनिवारी पेट्रोलचा भाव ७६.३१ रुपये आणि डिझेलचा भाव ६६. २१ रुपयांवर कायम आहे. आज त्यात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ७१.२६ रुपये आहे. डिझेलच्या दरात देखील कोणताही बदल झालेला नाही. डिझेलचा भाव ६९.३९ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोल दर ७५.५४ रुपये असून डिझेल ६८.२८ रुपये आहे. हैदराबादमध्ये पेट्रोल दर प्रती लीटर ७३.९७ रुपये असून डिझेल ६७.२८ रुपये आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!