Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘कही दूर जब दिन ढल जाए’, ‘जिंदगी कैसी ये पहेली’ या अजरामर गाण्याचे गीतकार कवी योगेश कालवश

Spread the love

प्रसिद्ध सिने गीतकार कवी योगश यांचे आज निधन झाले. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहत कवी योगेश यांना श्रद्धांजली वाहिली. ‘योगेश’ अशा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या प्रसिद्ध गीतकाराचे पूर्ण नाव योगेश गौर असे होते. त्यांच्या जन्म १९ मार्च १९४३ मध्ये झाला होता. आज वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘कही दूर जब दिन ढल जाए’, ‘जिंदगी कैसी ये पहेली’ या ‘आनंद’ चित्रपटातील गाण्यांसाठी कवी योगेश प्रसिद्ध होते.

कवी योगेश यांच्या निधनाबद्दल प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर  त्यांच्या पोस्टमध्ये कवी योगेश यांना’हृदयाला भिडणारे गीत लिहणारे कवी योगेश’ असे संबोधले आहे.  यात त्यांनी  असंही म्हटलं आहे की कवी योगेश यांनी लिहिलेली अनेक गाणी त्यांनी गायली होती. कवी योगेश यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील लखनऊ याठिकाणी झाला होता. ‘कही दूर जब दिन ढल जाए’, ‘जिंदगी कैसी ये पहेली’, ‘रिमझिम गिरे सावन’ यासारखी सदाबहार गाणी लिहण्याबरोबरच त्यांनी काही टेलिव्हिजन मालिकांसाठी लेखक म्हणून देखील काम केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!