Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात २९४० नवे रुग्ण , ९९ मृत्यू , एकूण रुग्णसंख्या ६५ हजारावर

Spread the love

राज्यात आज २९४० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ९९ जणांचा मृत्यू करोनाची लागण होऊन झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६५ हजार १६८ इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण २१९७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. दरम्यान आज राज्यात १ हजार ८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत २८ हजार ८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

राज्यात सध्याच्या घडीला ३४ हजार ८८१ अॅक्टिव्ह केसेस आहेत असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे. राज्यातला करोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता १७.५ दिवस झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट अर्थात रोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.७ टक्के एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. संस्थात्मक क्वारंटाइनसाठी ७२ हजार ६८१ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ९९ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ६२ पुरुष तर ३७ महिला होत्या. आज नोंदवण्यात आलेल्या ९९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ४८ रुग्ण होते. तर ४९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. २ रुग्ण ४० वर्षे वयाखालील होते. ज्या ९९ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी ६६ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर स्वरुपाचे आजार होते. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर सगळे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खासगी अशा ७७ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.०७ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.

राज्यात ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यात ठाणे- ८१ (मुंबई ५४, ठाणे ६, वसई-विरार ७, नवी मुंबई २, रायगड ३, पनवेल ७, कल्याण डोंबिवली २), नाशिक- ३ (जळगाव ३), पुणे- १२ (पुणे ६, सोलापूर ६), नागपूर-१, इतर राज्ये-२ राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये तर बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६२ पुरुष तर ३७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ९९ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २१९७ झाली आहे.आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ६ मे ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५९ मृत्यूंपैकी मुंबई ३५, पनवेल -७, ठाणे -६, वसई विरार – ६, नवी मुंबई -२, कल्याण डोंबिवली -१ जळगाव- १ तर १ मृत्यू इतर राज्यातील आहे.

सोलापुरात करोनामुळे आठ जणांचा मृत्यू

दरम्यान सोलापुरात आज एकाच दिवशी कोरोनामुळे सर्वाधिक आठ जणांचा मृत्यू झाला. नव्या १४ रूग्णांची नोंद झाली. एकूण रूग्णसंख्या ८६५ तर मृतांची संख्या ८३ वर पोहोचली आहे. एकाच दिवशी करोनाबाधित आठ रूग्णांचा मृत्यू होण्याची सोलापुरातील ही पहिलीच वेळ आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!