Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : Lock & Unlock : एका नजरेत समजून घ्या केंद्र सरकारचा नवीन निर्णय…

Spread the love

उद्या ३१ मे रोजी संपत असलेल्या लॉकडाउन 4.0 च्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारकडून लॉकडाउन 5.0 संदर्भात महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली असून नवीन लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. दरम्यान टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.  मागच्या दोन महिन्यांपासून करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे आतातरी लॉकडाउनमधून मुक्तता मिळणार? हाच प्रश्न सर्वांना पडला होता. त्या दृष्टीने केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता टप्प्याटप्प्याने देशातील सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील असे जाहीर करण्यात आले आहे त्यावर एक दृष्टिक्षेप.

पहिल्या टप्प्यात ८ जून पासून काय उघडणार ?

–  धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार. – हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार. – शॉपिंग मॉल उघडणार. मात्र यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालयाकडून दिली जाईल

दुसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यात काय उघडणार ?

– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील. पालकांसह सर्व संबंधितांचे याबद्दल मत जाणून घेण्यात येईल. जुलै महिन्यात या संदर्भात निर्णय होईल.

तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार

सर्व परिस्थितीचे आकलन करुन, व्यवस्थित आढावा घेऊन रेल्वे, हवाई प्रवास कधी सुरु करायचा त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.

– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे, – सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल, – क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान या निर्णयानुसार कन्टेन्मेट झोन अर्थात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात ३० जूनपर्यंत लॉकडाउन असणार आहे अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. पुढील एक महिन्यासाठीचे निर्देश गृहमंत्रलयाने जारी केले आहेत. करोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. लॉकडाउन मार्च महिन्यापासून सुरु आहे. अशात लॉकडाउनचा हा पाचवा टप्पा आहे मात्र तो कंटेन्मेट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रापुरता मर्यादित करण्यात आला आहे. कंटेन्मेट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे.

महत्वाच्या सूचना , निर्देश

सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम असणार आहे

आंतरराज्यीय प्रवासावर काहीही निर्बंध नसतील, यासंबंधीचे निर्णय राज्य सरकारंही घेऊ शकतील

६५ वर्षांच्या पेक्षा जास्त वय असलेले लोक आणि १० वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचा सल्ला

आवश्यक तेवढ्याच गोष्टींसाठी बाहेर पडण्याचे निर्देश

मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं बंधनकारक

लग्नासाठी फक्त ५० लोकांना संमती, कोणत्याही कारणाने गर्दी करण्याची संमती नाही

अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना संमती

शक्य असेल त्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारण्याचीही सूचना देण्यात आली आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!