Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : विवाहानंतर दहा वर्षांनी “तिला” जुळे झाले पण डॉक्टर “तिला ” नाही वाचवू शकले… !!

Spread the love

जगभर कोरोनाने अनेक कथांना जन्म दिला आहे . यात बऱ्या , वाईट दोन्हीही प्रकारांचा संबंध आहे . अशीच एक ह्रदयद्रावक  घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू  झाल्याने जन्मतःच दोन्हीही मुली मातृप्रेमाला पारख्या झाल्या विशेष म्हणजे विवाहानंतर दहा वर्षाने या महिलेला जुळे झाले खरे पण त्यांना पाहण्यासाठी हि माता जगात राहिली नाही. तिने  परवा गुरुवारी जुळ्यांना जन्म दिला होता. त्यात एक मुलगा आणि एका मुलगी आहे. दोन्ही बाळांची प्रकृती ठीक आहे. कोरोनाबाधित असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती. ही महिला मुंबईहून नगर जिल्ह्यातील निंबलक येथे आली होती. त्यानंतर तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात गुरुवारी एका कोरोनाबाधित महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला होता. सिझेरियन पद्धतीने ही प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश मिळालं होतं. विशेष म्हणजे, कोरोना उद्रेकाच्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि दोन्ही शिशुंना कोणातीही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण, शुक्रवारी महिलेची प्रकृती अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झाला. ही महिला उल्हासनगरहून निबळक येथे आली होती. ती ९ महिन्यांची गरोदर होती. तिला त्रास होऊ लागल्याने २४ तारखेला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं महिलेसह कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडली होती. कुटुंबात कोणालाही कोरोनाचा संसर्ग नसताना या महिलेला लागण झाल्याने कुटुंबीय चिंतीत झाले होते.

याबाबत डॉक्टरांच्या समोरही पेच होता  कि , एक तर महिला कोरोना पॉझिटिव्ह, मूल होत नाही, म्हणून ती IBF पद्धतीने गरोदर राहिलेली. ते ही लग्नानंतर 10 वर्षांनी, अशा परिस्थितीत नेमकं काय करावं? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. जिल्हा शल्य चिकित्सक मुरणबीकर यांनी  स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ.जोत्सना डोले यांची मदत घेतली. या महिलेची 28 मे रोजी सिझेरियन प्रसूती करण्यात आली. ही प्रसूती यशस्वी झाली असून या महिलेने एक मुलगा आणि मुलीला अशा जुळ्यांना जन्म दिला होता. तिच्यासाठी शासकीय रुग्णालयात कोविड-19 रूग्णालयात विशेष आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली . या महिलेवर आणि दोन्ही बाळांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. डॉ. मुरणबीकर आणि त्यांच्या टीमने ही प्रसूती यशस्वी केली आहे. आई आणि दोन्ही मुलांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. मात्र, महिलेचा शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजता मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!