Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

Spread the love

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. १५ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांनी ट्विटरवर अजित जोगी याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. अजित जोगी याच्या पार्थिवावर उद्या शनिवारी त्याचे जन्म ठिकाण गोरैला येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती, अमित जोगी यांनी दिली आहे.

९ मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अजित जोगी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यांच्या पत्नी रेणु जोगी त्यांचया जवळच होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आपल्या वडिलांची तब्येत बिघडल्याचे समजल्यानंतर त्यांचे पुत्र अमित जोगी तातडीने बिलासपूरला पोहोचले होते. स्वतंत्र छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर अजित जोगी हे छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्या वेळी ते छत्तीसगड जनता काँग्रेसचे नेते होते. त्यांनीच हा पक्ष स्थापन केला होता. त्या पूर्वी अजित जोगी हे प्रदीर्घ काळ काँग्रेस पक्षात होते. आयएएसची नोकरी सोडून ते राजकारणात आले. प्रथम ते विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर लोकसभा आणि नंतर राज्यसभा सदस्य आणि पुढे ते केंद्रातील कॅबिनेट मंत्री झाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!