Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraUpdate : अरुण गवळी पाच दिवसात हाजीर हो , मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

Spread the love

कुख्यात डॉन अरूण गवळीच्या पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत यापुढे कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही, असं सांगतानाच ५ दिवसात नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शरण येण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं कुख्यात डॉन अरूण गवळीला दिले आहेत. अरूण गवळी याने  २४ तासांमध्ये मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्यासंबंधीची परवानगी मागावी. तसेच ती परवानगी एका दिवसात मंजूर करून घ्यावी. त्यानंतर पुढील तीन दिवसांत गवळीनं नागपूर गाठावे, असे कोर्टाने  आदेशात म्हटले आहे.

पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळं अरूण गवळी हा पॅरोलवर नागपूर तुरुंगातून जवळपास ४५ दिवसांसाठी बाहेर आला होता. त्याच दरम्यान राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्यामुळं गवळीनं अर्ज करत पॅरोल वाढवण्याची विनंती केली होती. न्यायालयानं त्यावेळी विनंती मान्य करून १० मे रोजीपर्यंत त्याच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा वाढ करून २४ मे रोजीपर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर त्याला तुरुंगात जाऊन आत्मसमर्पण करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र, आपण या काळात कोणतेही गैरकृत्य अथवा लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले नसल्याचं सांगत पुन्हा पॅरोल वाढवून देण्याची विनंती कोर्टासमोर केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पॅरोल वाढवून देण्यास नकार दिला होता. आता यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्यासंबंधीची कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. येत्या ५ दिवसांत नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शरण येण्याचे आदेश कोर्टानं गवळीला दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!