#CoronaEffect : अशी एक बातमी , जी वाचून तुमचे मनही गहिवरून जाईल ….

Advertisements
Advertisements
Spread the love

कुत्र्यांच्या स्वामिभक्तीच्या कथा आपण नेहमीच ऐकतो पण या ७ वर्षीय जिओ बाओची कथा मनाला चटका लावणारी आहे.  कोरोनाच्या निमित्ताने जगाच्या कुठल्या कोपऱ्यातून कुठली बातमी येऊन धडकेल  सांगता येत नाही . जगभरात कोरोनाचा प्रसाद पोहोचवलेल्या चीनच्या वुहान शहरातील हि बातमी आहे जी वाचून कोणतीही व्यक्ती गहिवरल्याशिवाय राहत नाही.   या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चीनच्या वुहानमध्ये कोरोनामुळे अनेकांना मृत्यू झाला. त्यापैकी एका व्यक्तीचा पाळीव कुत्रा तीन महिन्यांपासून आपल्या मालकाची वाट पाहत आहे.

Advertisements

अशीच एका जपानी कत्र्याची कथा आहे . हाचिको त्याचे नाव. त्याच्यावर Hachikō नावाने  सिनेमाही आला . आपल्या मालकाला रेल्वेस्टेशनवर सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी हाचिको रोज जायचा आणि यायचा . एक दिवस त्याच्या मालकाचे ते ड्युटीवर असताना निधन झाले पण हाचिकोला याची खबरच नव्हती तो रोज स्टेशनवर जाऊन आपल्या मालकाची वाट पाहायचा शेवटी त्याचा मालकाची वाट पाहता पाहता हाचिको मरण पावला. त्याच्या नावाने त्याच स्टेशनबाहेर स्मारक तयार करण्यात आले . जिओ बाओची कथा त्याचीच पुनरावृत्ती आहे . या लिंकमध्ये त्याची कथा आपण पाहू शकता.


बातमी अशी आहे कि , हुबेईतील वुहानमध्ये एक पाळीव कुत्रा फेब्रुवारी महिन्यापासून एका रुग्णालयाबाहेर उभा आहे. कोरोनाच्यासंसर्गामुळे त्याच्या मालकाला या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होता. मात्र ५  दिवसांनी मालकाचा मृत्यू झाला. या घटनेला आता ३ महिन्यांचा काळ उलटला आहे. मात्र अद्यापही हा कुत्रा रुग्णालयाबाहेर आपल्या मालकाची वाट पाहत आहे. मेट्रोच्या बातमीनुसार रुग्णालय प्रशासनानुसार ७ वर्षीय जिओ बाओ नावाचा एक पाळीव कुत्रा अनेकदा रुग्णालयाच्या लॉबीत येऊ बसतो. त्याला अनेकदा लांब दुसऱ्या भागात सोडण्यात आलं मात्र तरीही तो वारंवार रुग्णालयाच्या या लॉबीत येऊन मालकाची वाट पाहत आहे. गेल्या ३महिन्यांपासून तो रुग्णालयाबाहेर मालकाची वाट पाहत आहे. या कुत्र्याला रुग्णालयाबाहेरील सुपरमार्केटचा मालक खायला देत आहे या मालकाने सांगितले की कुत्र्याचा मालिक कोरोना पॉझिटिव्ह होता व रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला. मात्र कुत्र्याला आपल्या मालकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती नाही.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार