Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

साकारात्क बातमी : कब्रस्तानात दफनविधीला विरोध , हिंदू व्यक्तींनी दिली स्वतःची जागा…

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकांमध्ये कोरोना संसर्गाविषयी भीतीचे वातावरण असल्याने अनेक बातम्या वाचायला , ऐकायला , पाहायला मिळतात . अनेक ठिकाणी लोक कोरोनाग्रस्त लोकांकडे भीतीने पाहतात त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकणे , स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त रुग्णांवर अंत्यसंस्कार करू न देणे असे प्रकार घडतात अशीच एक घटना हैद्राबाद मध्ये घडली. ह्रदयविकारामुळे  मरण पावलेल्या मुस्लिम व्यक्तीचे निधन कोरोनामुळे झाल्याच्या संशयावरून त्याला  मुस्लिम कबस्तानात दफन करण्यास लोकांनी विरोध केला त्यामुळे तणावात सापडलेल्या तरुणाला मदत करण्यासाठी दोन हिंदू तरुण पुढे आले आणि त्यांनी या व्यक्तीवर स्वतःच्या जागेत दफन करण्यास परवानगी दिली आणि या वादावर पडदा पडला . या सकारात्मक घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisements

याबाबतची अधिक माहिती अशी कि , हैद्राबाद येथे एका मुस्लीम व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच लोकांनी तो कोरोनाचा रुग्ण असल्याच्या संशयाने त्याचा मृतदेह दफन करण्यास नकार दिला. मात्र या व्यक्तीचा मृत्यू ह्रदयाचा झटका आल्याने झाला होता. कुटुंबीय त्या ज्येष्ठ व्यक्तीचा मृतदेह घेऊन इथे-तिथे भटकत होते. मात्र कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. शेवटी दोन हिंदू व्यक्तींनी त्यांचे शव दफन करण्यासाठी आपली जागा दिली.

Advertisements
Advertisements

वस्तुस्थिती अशी होती कि , रंगारेड्डी जिल्ह्याचे गंडमगुडा परिसरात राहणारे मोहम्मद खाजा मिया (55) यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला होता. कुटुंबीयांची त्यांचा मृतदेह दफन करण्यासाठी कब्रिस्तानात गेले तेव्हा कोरोनाचं संक्रमण होईल या भीतीने त्याला विरोध करण्यात आला. यानंतर दिवसभर मुलगा आपल्या वडिलांचा मृतदेह घेऊन शहरातील विविध कब्रिस्तानात विचारपूस करीत होता. मात्र कोणीच त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही. अखेर संदीप आणि शेखर नावाच्या दोन व्यक्तीनी वडिलाचा मृतदेह दफन करण्यासाठी स्वत:ची जागा दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!