Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaIndiaUpdate : जाणून घ्या देशातील आजची स्थिती , कोरोनाबाधितांची जगाची संख्या ५ लाख ८० हजाराच्या जवळ …

Spread the love

India Total Cases : 158,333 | Deaths: 4,534 | Recovered: 67,749

World Total Cases: 5,792,314 | Deaths: 357,471 | Recovered: 2,498,884

देशात गेल्या २४ तासांमध्ये आढळले करोनाचे ६,५६६ नवे रुग्ण, तर २४ तासांत झाला १९४ करोनाबाधितांचा मृत्यू- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.

देशात आतापर्यंत दीड लाखांहून अधिक करोनाबाधित आढळले असून काल बुधवारी दिवसभरात ६,३६६ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. देशात एकूण करोनाग्रस्तांची संख्या आहे १,५४,१४१. देशात १०९ दिवसांमध्ये १ लाख करोनारुग्ण आढळले. तर पुढील ५० हजार रुग्णांची संख्या ही केवळ ९ दिवसांत नोंदवली गेली आहे. दरम्यान राज्यांचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आहेत. बुधवारी महाराष्ट्रात २,१९० नवे रुग्ण आढळले. हे प्रमाण दिवसभरातील देशातील रुग्णांच्या एक तृतियांश इतके आहे. महाराष्ट्रात एकूण ५६,९४८ रुग्ण आहेत. देशाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रात ३७ टक्के रुग्ण आहेत.

गेल्या दिवसभरात महाराष्ट्रात १०५ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाला तीन अंकी मृत्यूची संख्या गाठणारे महाराष्ट्र हे देशात पहिलेच राज्य आहे. देशात एकूण मृत्यू ४,५२५ इतके झाले असून राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आहे १,८९७. महाराष्ट्रानंतर तामिळनाडूत दिवसभरात ८१७ नवे रुग्ण आढळले. त्यानंतर दिल्ली आणि गुजरात राज्यांनी १५००० चा टप्पा ओलांडला. दिवसभरात दिल्लीत ७९२ नव्या रुग्णांची नोंद झाली. या बरोबरच दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे १५,२५७. तर गुजरातमध्ये दिवसभरात ३७६ नवे रुग्ण आढळले. गुजरातमध्ये एकूण रुग्णसंख्या आहे १५,२०५.

गुजरातमध्ये दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पोहोचली आहे ७६४ वर. दिल्लीत दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर मध्य प्रदेशात ८ आणि तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी ६ मृत्यू नोंदवले गेले आहे.

उत्तर प्रदेशात दिवसभरात २६९ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या पोहोचली आहे ७,०२६ वर. राज्यात दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या पोहोचली आहे १७७ वर. तसेच दिवसभरात राजस्थान आणि कर्नाटकात प्रत्येकी ३ रुग्ण दगावले असून २ जम्मू आणि काश्मीर, तर आंध्र प्रदेश, बिहार आणि हरयाणात प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशात १३४ नवे रुग्ण आढलले असून एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे३,११७ वर. राज्यात एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या आहे ५८. तर, तेलंगणात १०७ नवे रुग्ण आढळले आहेत. आसाममध्ये एकूण रुग्णांची संख्या पोहचली आहे ७७४ वर. नागालँडमध्ये रुग्णांची संख्या ९ इतकी आहे. हे सर्व रुग्ण चेन्नईहून २२मे या दिवशी पोहोचल होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!