Aurangabad Update : लॉकडाऊन काळात पोलीस बंदोबस्त असतानाही दुकान फोडले, १० लाखांचा ऐवज लंपास

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – अपनाबाजार काॅम्प्लैक्स मधील प्रतिक इलैक्र्टाॅनिक्स नावाचे दुकानाचे शटर उचकटून तीन चोरट्यांनी आज पहाटे(बुधवार)२ते३च्या दरम्यान विविध कंपन्यांचे अंदाजे १०लाख रुपयांचे २७एलईडी टि.व्ही छोटा हत्ती या वाहनात भरुन नेले.ही घटना सी.सी.टि.व्ही.फुटेजमधे कैद झाली आहे.या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लखीतेजसिंग केसरसिंग दुमडा(४८) रा.सिंधी काॅलनी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. सकाळी ८वा.दुमडा यांनी दुकानावर चक्कर मारल्यानंतर त्यांना घटना घडल्याचे कळले.घटनास्थळी पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद, गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांचे फिंगरप्रिंट पोलिसांना उपलब्ध झालै आहेत.
अपनाबाजार काॅम्प्लेक्स मधील प्रत्यैक दुकानाला काचेचे आवरण आहे फक्त दुमडा यांच्या दुकानाला काचेचे आवरण नसल्याने चोरट्यांना सहज दुकानात प्रवेश मिळवता आला. आणखी पंधरा ते वीस एलइडी टि.व्ही. त्या ठिकाणी पडलेले पोलिस तपासात उघड झाले छोटा हत्ती या गाडीत केवळ २७एलइडी चोरुन नेता आल्याचे सी.सी.टि.व्ही. फुटेजवरुन पोलिसांना कळले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय टाक करंत आहेत.

Advertisements

आपलं सरकार