Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : हद्द झाली संशोधनाची !! आता म्हणतात २, ६ नव्हे तर १८ फुटाचे डिस्टन्स पाहिजे ….!!

Spread the love

गेल्या पाच महिन्यांपासून जग कोरोना व्हायरसवर संशोधन करण्यात गुंतले असले तरी या विषयीच्या संशोधनात कोणाचेही एकमत होताना दिसत नाही. या विषयावरून रोज नवीन नवीन संशोधन आणि अहवाल लोकांच्या समोर येत आहेत . कित्येक महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी दोन हात करत आहे. कोरोनाव्हायरसचा संसर्ग  रोखण्यासाठी बहुतेक देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र आता हा लॉकडाऊन हळूहळू शिथील केले जात आहे. . मात्र अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचं  काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र सध्या सोशल डिस्टन्सिंगसाठी जे अंतर निश्चित करण्यात आलं आहे ते पुरेसं नाही, त्या अंतराच्या तीनपट अंतरापर्यंत कोरोनाव्हायरस पसरू शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

प्रारंभी सध्या सर्वत्र दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. मात्र कोरोनाव्हायरस तब्बल 18 फूट अंतरापर्यंत पसरू शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हलकी हवा वाहत असेल, तर सौम्य खोकल्यानंही व्हायरस असलेले ड्रॉपलेट्स 18 फुटांपर्यंत हवेत पसरू शकतात असे  साइप्रसच्या निकोसिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे . फिजिक्स ऑफ फ्ल्युड जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे.

दरम्यान हेल्थलाईननुसार, संशोधकांनी एक कॉम्प्युटर सिम्युलेशन मॉडेल तयार केलं आहे. ज्यामार्फत ते खोकल्याद्वारे निघणाऱ्या लाळेच्या कणांच्या हवेतील गतिविधींचा अभ्यास करत आहेत. अभ्यासानुसार, पाच किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या हलक्या हवेत माणसाच्या लाळेचे कण पाच सेकंदात अठरा फुटांपर्यंत जाऊ शकतात असे संशोधनाचे अभ्यासक, डिमिट्रिस ड्रिकाकिस यांचे म्हणणे आहे. हे ड्रॉपलेट्स क्लाउड वेगवेगळ्या उंचीचे वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं दोघांवरही प्रभाव टाकू शकतात. जर कमी उंचीच्या व्यक्ती या ड्रॉपलेट्सच्या संपर्कात आल्या तर त्यांना याचा जास्त धोका आहे.  याबाबत अधिक अभ्यास चालू असल्याचंही या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!