#CoronaAurangabadUpdate : Good News : लवकरच औरंगाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये , ४६१ ऍक्टिव्ह रुग्ण , ८११ डिस्चार्ज तर ५८ मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

येत्या ३१ मे पर्यंत औरंगाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये करणारच असा संकल्प जिल्हाधिकारी उदय चौधरी , मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडे आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केल्यानुसार दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आरोग्य विभागाने आटोक्यात आणली असून आज रात्री जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित्यांची एकूण संख्या १३३० असली तरी यातून ८११ रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी पाठविण्यात आले असून ५८ जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला असल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ४६१ वर आली आहे. त्यामुळे लवकरच औरंगाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये येण्याची शक्यता आहे.


दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात आज 25 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1330 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) जुना मोंढा (1),  बायजीपुरा (2), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4),  जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), रहिम नगर (1)  या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 12 महिला आणि 13 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements

आतापर्यंत 811 जण कोरोनामुक्त

औरंगाबाद शहरातील मनपाच्या कोविड केअर केंद्र असलेल्या एमआयटी मुलांचे वस्तीगृह येथून चार, किल्लेअर्क येथून 14,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) दोन, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) सात, खासगी रुग्णालयातून तीन असे एकूण 30 कोरोनाबाधित रुग्ण आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातून 811 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असे मनपा प्रशासनाने कळवले आहे.

Advertisements
Advertisements

58 कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत औरंगाबाद शहरातील इंदिरा नगरातील 55 वर्षीय महिला, जय भीम नगरातील 72 वर्षीय पुरूष, जाधववाडीतील 57 वर्षीय पुरूष या  कोरोनाबाधित रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात आतापर्यंत चार, घाटीत 53 आणि मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 58 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

कोरोनाबाधित पोलीस आणि त्यांच्या मुलीचे स्वागत

गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा उपचार घेणारे पोलीस शिपाई आणि त्यांची मुलगी  हे दोघेही बरे झाल्याने त्यांना आज रोजी एमजीएम हॉस्पिटल मधून सोडण्यात आले. आपल्या कन्येसह ते त्यांच्या सोसायटीत देखील होताच तेथील रहिवाशांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.

आपलं सरकार