Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraUpdate : राज्यातील दुर्गम भागात १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा राज्य शासनाचा विचार : वर्षा गायकवाड

Spread the love

जगदीश कस्तुरे । औरंगाबाद 

औरंगाबाद – मराठवाडा,कोकण,विदर्भातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी इंटरनेट सेवा  अद्याप पोहोचली नाही किंवा विद्यार्थ्यांना इंटरनेट परवडंत नाही अशा भागात सोशल डिस्टंसिंग ठेवून शाळा सुरु करण्याबाबतचा विचार शासन  करीत असल्याची माहिती शालेयशिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

येत्या काही दिवसातंच पावसाळा सुरु होत आहेत तसेच  दुर्गम भागातील शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी दिवसभर शेतात राबतील अशा वेळी इंटररनेट सेवा उपलब्ध नसेल किंवा वापरणे परवडंत नसेल अशा भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करणे अत्यावश्यक आहे.शाळेतंच मुलांना पोषक आहार देण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.जर शाळा सुरु केल्या नाहीत तर मुले आपापल्या पालकांसोबंत शेतीच्या कामाला जुंपुंन घेतील.हे भविष्यात त्या मुलांसाठी भयावह आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर  मुंबइत आज राज्य भरातील केंद्रप्रमुखांसोबंत बैठक घेण्यात आल्याचेही गायकवाड म्हणाल्या.तसेच पावसाळा सुरु झाल्यानंतर कोकणात साथीचे रोगही सुरु होतात.त्यापासुन शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवून त्यांचे शिक्षण मार्गी लागले पाहिजे.या दृष्टीने युध्दपातळीवर राज्यातील दुर्गम भागातील मुलांच्या पालकांना विश्र्वासात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर दर आठवड्याला शाळेची स्वच्छता सॅनिटाईजिंगही करण्यावर भर राहिल असे शेवटी गायकवाड म्हणाल्या

आपलं सरकार

Click to listen highlighted text!