Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronavirusUpdate : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाबाबत आयसीएमआरच्या नवीन गाईडलाईन समजून घ्या….

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) नव्या गाईडलाईन्य जाहीर केल्या आहेत. कोरोनाची लक्षणं असल्याशिवाय टेस्टिंगच होणार नसल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. याविषयी माहिती देताना पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं की, यापुढे कोरोना पेशंटच्या फक्त हाय रिस्क संपर्कांत आलेल्या संशशियतांचीच चाचणी होणार आहे. फस्ट कॉन्टक्टमधील संशयितांचीही 5-6 दिवसानंतरच टेस्टिंग होईल. Asymptotic पेशंटच्या टेस्टिंगची आवश्यकता नाही.आयसीएमआरच्या नव्या गाईडलाईन्समुळे टेस्टिंगची संख्या झपाट्याने खाली येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

आयसीएमआरने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार दहा दिवस रुग्णाला कोणतेही लक्षणे नसतील यात शेवटचे तीन दिवस आठ, नऊ, दहाव्या दिवशीपर्यंत ताप, खोकला व दम लागणे हे नसेल तर डिस्चार्ज देण्यात यावा. त्याला पुन्हा टेस्ट करण्याचीही गरज नाही. दहा दिवस उपचारानंतर डिस्चार्ज देताना रुग्णाला सर्व सूचना लिखित स्वरूपात दिल्या जातात. हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. डिस्चार्जनंतर सात दिवस होम आयसोलेशनयामध्ये राहावे लागणार आहे. इतरांमध्ये मिसळायचे नाही. घरातही तोंडाला मास्क लावायचा. बाहेर कुठेही फिरायचे नाही. अशी सर्वप्रकारे रुग्णांनी काळजी घेयची आहे. त्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी काही त्रास जाणवला तर मनपा आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

महापालिकेने प्रत्येक एरियानुसार होम क्वारंटाईनची वेगळी टास्क फोर्सची टीम तयार केली आहे. दहा दिवसानंतर कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर त्या रुग्णाची सर्व माहिती त्यात्या एरियाच्या टास्क फोर्सला कळविली जाते. त्यानंतर ही टीम दररोज हे रुग्ण घरी आहेत का? त्यांना काही त्रास आहे का? याबाबत देखरेख ठेवतात. सर्वप्रकारे काळजी घेतली जाते. त्या भागातील मनपा आरोग्य केंद्रातून त्या रुग्णाला दररोज फोन केला जातो. ज्या रुग्णाला दहा दिवसानंतरही ताप, खोकला, दम लागणे अशी कोरोनाची लक्षणे असतील त्यांना डिस्चार्ज दिला जात नाही. जो पर्यंत लक्षणे संपणार नाहीत तो पर्यंत त्यांना रुग्णालयात किंवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!