Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaMaharashtra Update : राज्याच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

Spread the love

राज्यात कोरोनाचा कहर वाढतच असून प्रत्येक क्षेत्रातील लोकांना कळत -नकळतपणे जराशी जरी चूक झाली तरी कोरोनाची बाधा होताना दिसत आहे. त्यातच राज्याच्या मंत्रिमंडळातील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झळा असल्याचे वृत्त वाहिन्यांनी दिले असल्याचे एकाच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ” आज तक ” नावाच्या हिंदी चॅनलने तर त्यांच्या नावासह वृत्त चालवले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचे कारण कोरोना झालेल्या कुठल्याही रुग्णाचे  नाव जाहीर करू नये असा  साथ रोग कायद्याचा नियम आहे . दरम्यान गेल्या महिन्यात एका वृत्त वाहिनीने एका मंत्र्यांचे आणि त्याच्या मुलीचे नाव देऊन त्यांना कोरोना झाल्याचे वृत्त दिले होते त्यावरून त्यांच्याविरुद्ध कारवाई सुद्धा झाली होती परंतु काही प्रसिद्धी माध्यमे कोणत्याही कायद्याला जुमानतांना दिसत नाहीत हेच यातून सिद्ध पुन्हा पुन्हा होत आहे.

दरम्यान महाराष्ट्रात  कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद  यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. स्थिती असूनही नियंत्रणात असली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत अशा सर्वच स्तरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसत आहे.  हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण  झाल्याचे  स्पष्ट झाले  आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र अशातच या जागतिक संकटात रस्त्यावर उतरून लढताना राजकीय नेत्यांनाही हा व्हायरस लक्ष्य करू लागला आहे. त्यातच एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आहे.

साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार सरकारने कोरोनाबाधितांची नावे जाहीर करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचं नावंही उघड करता येणार नाही. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्वतः आव्हाड यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती तर राज्य सरकारच्या गृहविभागाने त्यांचे वृत्त देणाऱ्या वृत्त वाहिन्यांना नोटीसही दिली होती. दरम्यान आव्हाड यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि अत्यंत कठीण स्थिती त्यांनी कोरोनावर मात केली. कोरोनाला हरवल्यानंतर स्वत: आव्हाड यांनीच पुढे येत मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं होतं आता आणखी एका मंत्रिमहोदयांनी कोरोनाची लागण झाल्यानेचिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!