Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : “मला काहीही होणार नाही…” या ओव्हरकॉन्फिडन्स मध्ये राहू नका , “या” तरुणाचा केवळ अर्ध्या तासात गेला जीव…

Spread the love

कोरोनावरून बरेच गैसमज आहेत म्हणजे हे गैरसमज आपण आपलेच करून घेतले आहेत . बऱ्याचदा असे वाचनात येते कि , कोरोनामुळे वृद्ध लोकांनाच धोका आहे, तरुणांना काहीही होत नाही पण असे काहीच नाही लहान बालकांपासून ते तरुण आणि वृद्धांपर्यंत कोरोना कोणालाही होऊ शकतो . अशाच भ्रमात ओव्हरकॉन्फिडन्समध्ये  राहिल्यामुळे आपली जोखीम वाढू शकते. याचीच प्रचिती पुणे शहरात आली असून याबाबत टीव्ही ९ ने वृत्त दिलं आहे.या वृत्तानुसार कोरोनाची लक्षणं दिसत असतानाही  त्यांच्याकडे दुर्लक्ष करत योग्यवेळी उपचार न घेतल्याने पुण्यातील एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तरुणाने अवघ्या अर्ध्या तासात प्राण सोडले.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , पुण्यातील गुलटेकडी या परिसरात राहणाऱ्या एक तरुणाला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसून येत होती. मात्र आपल्याला काही होणार नाही, असा अतिआत्मविश्वास की कोरोनाबद्दलची भीती…नेमकं कारण माहीत नाही. मात्र या तरुणाने होणाऱ्या शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करत उपचार घेणं टाळलं. मात्र २२ मे रोजी या तरुणाला त्रास असह्य झाला आणि त्याने रुग्णालयात धाव घेतली.

दरम्यान श्वसनाचा त्रास होत असलेल्या संबंधित तरुणाला २२ मे रोजी रात्री साडेसात वाजता रुग्णालयता दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर उपचार सुरू असताना अर्ध्या तासातच या तरुणाचा मृत्यू झाला. लक्षणं दिसत असतानाही उपचारासाठी रुग्णालयात न जाण्याच्या चुकीने या तरुणाचं आयुष्य हिरावून घेतलं. २३ मे रोजी आलेल्या अहवालातून सदर तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाले . वाचकांनी या  वृत्तापासून धडा घेण्याची गरज आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!