AurangabadNewsUpdate : रमझान ईद निमित्त आयोजित मोफत डायलिसिस शिबिरात 13 रुग्णांना लाभ

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद लॉयन्स मिडटाउन मेडिकल ट्रस्ट संचलित मिडटाउन लायन्स डायलेसिस सेन्टर येथे रमझान ईद निमित मोफत डायलिसिस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी 13 डायलिसिसचे रुग्ण लाभान्वित झाले. या शिबिराचे उदघाटन लायन सईद मसीयुद्दीन यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी लायन्स मिडटाउन मेडिकल सर्विस ट्रस्ट के अध्यक्ष महावीर पाटणी, लायन्स चे अंतराष्ट्रीय संचालक डॉ नवल मालू , कोषाध्यक्ष अनिल माली, सहसचिव नितीन संकलेचा इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक ट्रस्ट चे अध्यक्ष महावीर पाटनी यानी केले प्रसंगी बोलताना डॉ नवल मालू यानी लायन्स इंटरनॅशनल, लायन्स परिवार औरंगाबाद आणि शासनाच्या सहकार्याने लवकरच किडनी ट्रांसप्लांट हॉस्पिटल सुरु करण्यासाठी तयारी सुरु आहे असे सांगितले.

Advertisements

लायन सइद मसीयुद्दीन यानी लॉयन्स ब्लड बँकेतर्फे सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे सांगितले तसेच लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद मिडटाउन अन्तर्गत सुरु असलेल्या या अत्यंत महत्वपूर्ण डायलेसिस प्रकल्प रुग्णासाठी जीवनदायी ठरत आहेत त्या बदल ट्रस्ट च्या सर्व पदधिकार्याचे अभिनन्दन केले. याप्रसंगी सर्व रुग्णांना  अनिल माली यानी फळे वाटली. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अनिल माळी यानी केले तर कार्यक्रमाचे आभार नितीन संकलेचा यानी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ शेखर शिराढोणकर, डॉ राजुल जैन,ज्ञानेश्वर गायकवाड ,जावळे इत्यादीनी परिश्रम घेतल्याची माहिती  ट्रस्ट चे प्रसिद्धि अधिकारी डॉ सतीश सुराणा यानी दिली

Advertisements
Advertisements

आपलं सरकार