AurangabadNewsUpdate : कोविड केअर सेंटरमधून ५३ रुग्णांची घरी रवानगी , आयुक्तांनी दिला निरोप

Advertisements
Advertisements
Spread the love

मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील किलेअर्क व एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोविड केअर सेंटर ला भेट देऊन किलेअर्क येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी त्यांनी तेथील उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला जसे की रुग्णांचे जेवण,पिण्याचे पाणी , स्वछता याविषयी त्यांनी रुग्णांकडून आढावा घेतला याबद्दल रुग्णांनी मनपा देत असलेल्या सुविधांची प्रशंसा केली .
यावेळी आयुक्त पांडेय  यांनी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना म्हणाले की , आपण हँड सॅनिटायझर, साबणाने हाथ धुणे,मास्क चा वापर करणे व सोशल डिस्टन्स चा वापर करून कमीत कमी घराबाहेर निघणे या गोष्टींचा अवलंब केला तर आपण पूर्णपणे सुरक्षित राहणार आहेत . नवीन शासन निर्देश नुसार ज्या रुग्णांना 10 दिवस पूर्ण झाले त्या रुग्णांना घरी पाठवण्यात येणार आहे . ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नाहीत कुठलाही त्रास होत नाही अशा रुग्णांना घरी पाठवण्यात येणार आहे . त्या नुसार आज किलेअर्क येथील 53 पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना आज घरी पाठविण्यात आले .यावेळी त्यांनी उपस्थित रुग्णांना ईद च्या शुभेच्छा दिल्या आणि  डॉक्टर्स  नर्स व इतर स्टाफ चे आभार मानले . तसेच आयुक्त पांडेय  यांनी एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोविड केअर सेंटर ला भेट देऊन तेथील रुग्णांची विचारपूस केली. व तेथील उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला .

Advertisements

आपलं सरकार