Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : धक्कादायक : वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारतीयांची चिंता वाढली , गेल्या २४ तासात ७ हजारापर्यंत वाढ …

Spread the love

World : Total Cases: 5,408,187 | Deaths: 344,041 ( 13% ) | Recovered: 2,248,906 ( 87 % )

India : Total Cases:  131,920 | Deaths: 3,869 (7 %) | Recovered: 54,441 (93 %)

भारतातील लॉक डाऊन चौथ्या टप्प्यात असले तरी  देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने  चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाची 6767 नवीन रुग्णांची  नोंद झाली आहे.  समोर आलेल्या नवीन प्रकरणांमुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 1,31,868 झाली आहे. शनिवारी कोव्हिड-19 मुळे 147 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील एकूण मृतांची संख्या 3,867 पर्यंत पोहोचली आहे. देशात 73,560 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत तर 54,440 रूग्ण बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत 3,867 रुग्णांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे, त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 1,577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर गुजरातमध्ये 829 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमणामुळे मध्य प्रदेशात ही संख्या 281, पश्चिम बंगालमध्ये 269 आणि दिल्लीत 231 आहे. राजस्थानात संक्रमणामुळे 160 जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशात 155, तामिळनाडूमध्ये 103 आणि आंध्र प्रदेशात 56 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोव्हिड-19 मुळे तेलंगणात मृतांचा आकडा 45, कर्नाटकात 41 आणि पंजाबमध्ये 39 वर पोहोचला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 20, हरियाणामध्ये 16, बिहारमध्ये 11, ओडिशामध्ये 7, केरळ आणि आसाममधील प्रत्येकी 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंड, चंदीगड आणि हिमाचल प्रदेशात संक्रमणामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आणि मेघालय आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्या मृत्यूंपैकी 70 टक्क्यांहून अधिक रुग्णांना इतर आजारांनीही ग्रासलं होतं.

दरम्यान  कोरोना व्हायरस बाबतीत भारत जागतिक क्रमवारीत ११ व्या क्रमांकावर असून आता  इराणलाही मागे टाकून १० व्या क्रमांकावर जाण्याची चिंन्हे आहेत. भारतातील सुमारे 1.32 लाख लोक कोव्हिड-19 पासून त्रस्त आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत भारत 11 व्या क्रमांकावर होता. इराण (1.33 लाख) दहाव्या क्रमांकावर होता. या दोन देशांमध्ये केवळ दोन हजार प्रकरणांमध्ये फरक होता. शनिवारी इराणमध्ये सुमारे 2000 नवीन प्रकरणं नोंदली गेली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!