Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कोरोनाच्या काळातही भाजपचे राजकारण सुरूच , खासदारपुत्रांनी मारहाण केल्याचा आरोप

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरु असता औरंगाबाद शहरात भाजपच्या खासदार पुत्रांनी एका भाजप कार्यकर्त्याला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या बाबत फिर्यादी भाजपचा कार्यकर्ता कुणाल नितीन मराठे (रा.कोटला कॉलनी) याने म्हटले आहे कि  भाजपचे खासदार डॉ.भागवत कराड यांच्या मुलांनी शनिवारी (23 मे) रात्री भाघरात घुसून बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर घरातल्या महिलांनाही धक्काबुक्की केली. दरम्यान, हे प्रकरण पक्षातंर्गत असल्याने दोन्ही बाजुंनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकरणी क्रांती चौक  पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या मारहाणीत कुणाल नितीन मराठे (वय-25, कोटला कॉलनी)  यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. कुणाल यांनी सांगितलं की, 23 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते घरी जेवण करत असताना हर्षवर्धन कराड, वरुण कराड आणि पवण सोनवणे आले. तू वार्डमध्ये फिरायचं नाही. कारण आगामी महानगर पालिका निवडणुकीत मला तिकीट मिळणार आहे. लोकांनाही मदत करत जाऊ नकोस, असा दम देत तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्यासह माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला या तिघांपासून धोका असल्याचं कुणाल मराठे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!