#CoronaEffect : यापुढे याचिकांची इ फाईलिंग करा , उच्चन्यायालयाचे आदेश , खंडपीठातही कोरोनाचा शिरकाव

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – यापुढे येणार्‍या याचिका इ फाईलिंग करा असे आदेश उच्चन्यायालयाने जिल्हान्यायालयाला बजावले आहेत.
लाॅकडाऊन सुरु झाले तेंव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात इमेल द्वारे याचिका दाखल करवून घेण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. पण लाॅकडाऊनचा चौथा फेरा संपत आला तरी कोरोना ची साखळी अद्याप तुटलेली नाही या पार्श्र्वभूमीवर मुंबई उच्चन्यायालयाने राज्यातील जिल्हान्यायालयांना यापुढील याचिका इमेल द्वारे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानंतर जिल्हान्यायालयाने वकील आणि याचिका कर्त्यांना ए४साईजचा पेपर याचिका दाखल करतेवेळी वापरावा कारण लिगलपेपरसाठी लागणारे प्रिंटर न्यायालयाकडे उपलब्ध नाहीत.अशी माहिती सूत्रांनी दिली.

Advertisements

खंडपीठातही शिरला कोरोना

Advertisements
Advertisements

दरम्यान औरंगाबाद खंडपीठातील तीन कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली यातील दोन डिकरी विभागातले आहेत तर एक न्यायमूर्ती निवासस्थानातील शिपाई असल्याचे सूत्रांनी सांगितले

Leave a Reply

आपलं सरकार