Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शहरातील आणखी दोन महिलांचा मृत्यू , एकूण संख्या ४४ तर रुग्णसंख्या १२१२

Spread the love

औरंगाबाद शहरात वाढणारा कोरोना व्हायरसने  जिल्ह्यातही हात पाय पसरण्यास सुरुवात केली असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे. दरम्यान शहरातील दोन करोनाबाधित महिलांचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ४४ झाली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १,२१२ झाली असून त्यापैकी  ५०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत हि एक जमेची बाजू आहे.

मृत महिलांविषयीची अधिक  माहिती अशी कि, शहरातील संजय नगर भागातील ४१ वर्षीय महिला रुग्णास १६ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) दाखल करण्यात आले होते. संबंधित महिला ही करोनाबाधित असल्याचे १९ मे रोजीच्या चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. मात्र न्यूमोनिया, गंभीर श्वसनविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी अतिजोखमीचे आजार आणि करोना विषाणूच्या संसर्गामुळे संबंधित महिला रुग्णाचा गुरुवारी (२१ मे) दुपारी एक वाजता मृत्यू झाला. तसेच बहादूरपुरा येथील ७० वर्षीय महिलेला १४ मे रोजी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ही महिला करोनाबाधित असल्याचे १५ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया, श्वसनविकार, मधुमेह आदी आजार आणि करोना संसर्गामुळे या वृद्ध महिलेचा आज, शुक्रवारी (२२ मे) पहाटे ३.१५ वाजता मृत्यू झाला, असे घाटी प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या आता ४४ झाली आहे.

दरम्यान, शहर परिसरात आज आणखी २६ व्यक्ती करोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १२१२ झाली आहे. बाधितांमध्ये जयभीम नगर येथील ५, गरम पाणी २, रहेमानिया कॉलनी २, कुवार फुल्ली, राजाबाजार १, सुराणा नगर १, मिलकॉर्नर १, न्याय नगर ४, भवानीनगर, जुना मोंढा ३, पुंडलिकनगर १, सातारा परिसर १, जवाहर कॉलनी १, कटकट गेट ३, एक-दोन, सिडको, ठाकरे नगर येथील १ या भागातील व्यक्तींचा समावेश आहे. यात ८ वर्षांची दोन मुले आणि ७० वर्षांच्या व्यक्तीचाही समावेश आहे. बाधितांमध्ये १० महिला, तर १६ पुरुष आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!