MaharashtraNewsUpdate : कोरोनामुळे राज्यातील पहिल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर चालूच असून ठाणे पोलीस दलातील करोनाची लागण झालेल्या एका ४४ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गुरुवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या पोलिस शिपाई म्हणून ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या मात्र  २७ मार्चपासून वैद्यकीय रजेवर होत्या.  या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मूत्रपिंडाचा आजार होता.  दरम्यान आतापर्यंत ठाणे पोलिस दलातील एकाही कर्मचाऱ्याचा करोनाने मृत्यू झाला नव्हता. मात्र  या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राज्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पहिलाच मृत्यू ठरला आहे.

Advertisements

या महिला मर्मचाऱ्याला १९ मे रोजी ज्युपिटर रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार चालू असताना दुसऱ्या दिवशी करोना चाचणीसाठी त्यांच्या घशातील स्वॅब घेतल्यानंतर आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, करोनाशी झुंज देत असताना आजच दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. त्या वागळे इस्टेटमधील कैलासनगरमध्ये राहत होत्या. करोना बाधित महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची राज्यातील पहिलीच घटना असून यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. आतापर्यंत ठाणे पोलिस दलातील ७२ कर्मचारी आणि ११ अधिकारी अशा एकूण ८३ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. तर, १० अधिकारी आणि २७ कर्मचारी असे एकूण ३७ कर्मचारी बरे झाल्याची माहिती ठाणे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Advertisements
Advertisements

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे म्हणाले कि , मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे पती एसआरपीएफ जवान होते. मात्र नक्षलवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना ठाणे पोलिस दलात अनुकंपा तत्वावर घेण्यात आले होते. या महिला पोलिस शिपायास दोन मुले  असून एक २४ वर्षांचा आणि दुसरा २० वर्षांचा आहे.

Leave a Reply

आपलं सरकार