#CoronaVirusEffect : मुंबई : सिने-नाट्य सृष्टीतील कलावंतांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद , तोडगा काढण्याचे आश्वासन

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यातील नाट्य सिनेसृष्टीतील कलावंत आणि निर्माते दिग्दर्शकांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले कि , शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरू करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल.  व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी तसेच मान्यवर निर्माते, कलाकार सहभागी झाले होते.

Advertisements

या कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन सुबोध भावे व आदेश बांदेकर यांनी केले तर खासदार डॉ. अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे, अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे आदींनी सूचना केल्या तसेच आपल्या समस्या मांडल्या.

Advertisements
Advertisements

या कलावंतांनी दिलेल्या माहितीनुसार ७० हिंदी, ४० मराठी आणि १० ओटीटी अशा ११० मालिकांची चित्रीकरणे कोरोनामुळे थांबली असून ३ लाख कामगार व तंत्रज्ञ यांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे. ३० हजार एपिसोड दर वर्षी तयार होतात. हजारो कोटींची गुंतवणूक यात आहे, याबाबत  नितीन वैद्य यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. निर्मात्यांना विना तारण कर्ज तसेच कमी व्याजाचे कर्ज, एक पडदा चित्रपटगृहाना वाचविणे, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटाना अनुदान रक्कम देणे, चित्रपट निर्मितीवरील जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. येणारा गणेशोत्सव व पुढील हंगामासाठी शारीरिक अंतर, मास्क घालणे आदि नियम पाळून विविध शो आणि कार्यक्रमांना परवानगी मिळावी. त्यामुळे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल असेही काही जणांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य शासन करोनाचा मुकाबला कशा रीतीने करीत आहे, याची माहिती दिली व सांगितले की, आपण आता कंटेनमेंट क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या क्षेत्रांची व्याप्तीही कमी केली आहे. महाराष्ट्रातले करमणूक आणि मनोरंजन क्षेत्र मोठे आहे. यावर रोजीरोटी कमावणारे लहान मोठे कलाकार तर आहेतच शिवाय तंत्रज्ञ, बॅक स्टेज कलाकार, कामगार हा वर्गही मोठा आहे. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी चित्रपटनगरीतील सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत, लोककला, तमाशा कलावंत यांना आर्थिक आधार यासंदर्भात निश्चितपणे विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

आपलं सरकार