Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? बिअरसाठी महिलांनी घातला क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ

Spread the love

मुरादाबादमधील एमआयटी क्वारंटाईन सेंटरमध्ये मुंबईतील आदर्श कॉलनीतून परतलेल्या महिलांना ठेवण्यात आले होते.  या महिलांनी बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ घातला. क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविलेल्या बार डान्सरनी मंगळवारी सायंकाळी येथे गोंधळ घातला. त्यांनी येथे बिअरची मागणी करीत सेंटरमध्ये धुडगूस घातला. यामध्ये एका महिलेने तर आपल्या 3 वर्षांच्या मुलाला बाल्कनीत लटकवून खाली फेकून देण्याची धमकी दिली. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा काही महिलांनी स्वत:चे कपडे काढण्यास सुरुवात केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसेबसे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. एसएसपी अमित पाठक यांनी सांगितले की,

याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस अधीक्षक दीपक भूकर यांनी सांगितले की, मुंबईहून आदर्श कॉलनीहून परतलेल्या 72 लोकांपैकी 3 ते 13 वर्षांमधील 12 मुलं, 40 महिला आणि 20 पुरुष आहेत. मुंबईहून परतल्यानंतर यापैकी 20 जणांची कोरोना चाचणी झाली होती. ज्यापैकी 5 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. मंगळवारी बाकी सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एएसपी यांनी सांगितले की,  या महिला क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यासाठी तयार नव्हत्या . समजूत घालून महत्प्रयासाने त्यांना एमआयटीपर्यंत आणण्यात आले. यानंतर सायंकाळी 5 वाजता या महिलांनी गोंधळ  घातला. या महिलांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे बिअरची मागणी केली. विरोध केल्यास एका महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला एमआयटी हॉस्टेलमधील बाल्कनीतून खाली फेकण्याची धमकी दिली. जर बिअर आणून दिली नाही तर ती मुलाला खाली फेकून देईन. यादरम्यान काही महिलांनी आपले कपडे काढून फेकून दिले व अंतर्वस्त्रात नृत्य करू लागले. जर बिअर दिली नाही तर असाच गोंधळ घालून अशी धमकी महिला देत होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!