#CoronaEffect : पुण्याहून घरी परतणाऱ्या मजुराचा वाटेतच मृत्यू …

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हताश झालेल्या एका 40 वर्षीय प्रवासी मजुराचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी सांगितले की, सोमवारी बीड जिल्ह्यातील धनोरा गावातील पिंटू पवार यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून साधारण 200 किमी दूर सापडला. पुणे जिल्ह्यातून पायी प्रवास करीत हा मजूर परभणी येथे घरी जात होता.

Advertisements

या विषयी अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, शवविच्छेदनानुसार आलेल्या माहितीनुसार जास्त वेळ चालणे, भूक आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने 15 मेच्या जवळपास त्यांचा मृत्यू झाला होता. मृतक परभणी जिल्ह्यातील राहणारे आहेत. ते ऊसाच्या शेतात काम करत होते. मात्र लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ते पुण्यात आपल्या भावाच्या घरी राहण्यासाठी गेले होते. पिंटू यांनी आपल्या गावी जाण्याचे ठरवले होते. 8 मे रोजी ते पायीच निघाले आणि 14 मे रोजी अहमदनगरला पोहोचले. त्यांच्याकडे मोबाइल फोन नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणा व्यक्तीच्या फोनवरुन 14 मे रोजी आपल्या घरी संपर्क केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेथून ते 30 ते 35 किमी चालत धनोरा पोहोचले आणि एका शेडखाली आराम करण्यासाठी थांबले.

Advertisements
Advertisements

दरम्यान सोमवारी तेथून जाणाऱ्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यावेळी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा पोलीस घटनास्थळी हजर राहिली तेव्हा पिंटू पवार तेथे मृत अवस्थेत सापडले. शवविच्छेदनानंतर मृतकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत धनोरा ग्राम पंचायत आणि पोलिसांनी मृतकावर अंत्यसंस्कार केला.

Leave a Reply

आपलं सरकार