#AurangabadNewsUpdate : “तो ” कोरोना पाॅझिटिव्ह हर्सूल कारागृहातील नाही, वैद्यकीय सूत्रांचा खुलासा …

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – आज आरोग्य विभागाने सकाळी जाहीर केलेल्या  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत हर्सूल कारागृहातील एक कैदी कोरोना पाॅझिटिव्ह दाखवल्याने खळबळ उडाली होती यावर आज दिवसभर हर्सूल कारागृह प्रशासनाला उत्तरे द्यावी लागली तेंव्हा खुलासा करण्यात आला कि , आजच्या यादीतील “तो” कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हर्सूल कारागृहातील नसून हर्सूल गाव परिसरातील आहे. वैद्यकीय सूत्रांकडून चुकुन तो हर्सूल कारागृहाचा कैदी असल्याचे जाहिर झाले होते. त्याबद्दल वरिष्ठ वैद्यकीय सूत्रांनी दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा टाकला.
गुरुवारी दिवसभर शहरात हर्सूल कारागृहातील कारभाराचा पाढा ठिकठिकाणी वाचला जात होता. काल हर्सूल कारागृहातील १०० कैद्यांचे स्वॅब चे नमुने घेतले व त्यातील एक कैदी हर्सूल कारागृहातील आहे अशी माहिती उजेडात आल्यानंतर हर्सूल कारागृहाचे प्रमुख हिरालाल जाधव यांनी आपला कोणताही कैदी कोरोना पाॅझिटिव्ह नाही असा खुलासा केला. पण त्यांच्या या खुलाशावर कोणीही विश्वास  ठेवंत नव्हते. त्यावर जाधव यांनी कैद्याचा वैद्यकीय अहवाल मिळावयास हवा अशी भूमीका घेतली. शेवटी संध्याकाळी ४ वा. वैद्यकीय सूत्रांनी खुलासा केल्यावर या वादावर पडदा पडला.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार