Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

यामुळे ‘Ola’च्या १,४०० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ

Spread the love

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम कंपन्यांवर झाल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. यामुळे देशातील काही कंपन्यांनी कमी पगार देण्यास सुरूवात केली. या काळात असाच फटका ऑनलाइन कॅब बुक करणाऱ्या ओला कंपनीला बसला आहे. त्यामुळे १ हजार ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

ओलाचे मुख्यकार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी सांगितले कि, कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन महिन्यात कॅब, आर्थिक सेवा आणि खाद्य विभागतून होणाऱ्या उत्पन्नात ९५ टक्के घट झाली आहे. यामुळे कंपनीने १ हजार ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला आहे. या मेलमध्ये त्यांनी भविष्यातील व्यवसाय अत्यंत अस्पष्ट आणि अनिश्चित असले. या संकटाचा मोठा परिणाम आपल्यावर दिर्घ कालावधीसाठी राहिल, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. तसेच  आपल्या उद्योगासाठी हा व्हायरस अत्यंत धोकादायक आहे. गेल्या दोन महिन्यापासून आपल्या उत्पन्नात ९५ टक्के इतकी घट झाली आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे कंपनीचे लाखो चालक आणि त्यांच्या कुटुंबियांवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे कंपनीला १ हजार ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला.

कर्मचारी कपातीचा निर्णय घेणारी ओला ही पहिली कंपनी नाही. याआधी जेवणाची ऑनलाइन डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटो आणि स्विगीने देखील, कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली होती. स्विगीने देशभरातील १ हजार १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. तर झोमॅटोने १३ टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचे म्हटले आहे. करोना व्हायरसमुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे आणि तो भविष्यात काही काळ कायम राहील, असे स्विगीचे सहसंस्थापक हर्ष माजेती यांनी सोमवारी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. येणाऱ्या काळात यातून आपण नक्की बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्मचारी संख्या कमी करण्याबरोबरच येणाऱ्या काळातील अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी खर्चात कपात करावी लागणार असल्याचे हर्ष माजेती म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!