Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaEffect : एक जूनपासून मजुरांसाठी २०० विशेष श्रमिक ट्रेन्स सुरु होतील : पियुष गोयल

Spread the love

येत्या १ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जातील असं पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्रेन्ससाठीचे ऑनलाइन बुकिंगही लवकरच सुरु होईल असंही गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल आणि श्रीमंतासाठी राजधानी स्पेशल सुरु केल्यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस सुर करणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. दरम्यान आतापर्यंत भारतीय रेल्वेने आतापर्यंत १५९५ रेल्वेची व्यवस्था करून २१ लाख मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.

रेल्वेद्वारे १ जूनपासून रोज २०० नॉन एसी ट्रेन चालवल्या जातील. या ट्रेनसाठी फक्त ऑनलाइन बुकींग होईल. लवकर या ट्रेनसाठी बुकींग सुरू होईल. याची माहिती रेल्वेकडून दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी ट्विट करून सांगितलंय. पुढच्या दोन दिवसांमध्ये रेल्वेकडून दुप्पट श्रमिक विशेष ट्रेन म्हणजे रोज ४०० ट्रेन चालवल्या जातील. सर्व स्थलांतरीत मजुरांनी आहे त्याच ठिकाणी रहावं. त्यांना पुढच्या काही दिवसांत सुरक्षितपणे त्यांच्या गावी रेल्वेद्वारे सोडण्यात येईल, असं गोयल म्हणाले. स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी राज्यांनी रेल्वेला सहकार्य करावं. त्यांची जवळच्या रेल्वे स्टेशनच्या रजिस्टरमध्ये त्यांचीनोंद करावी. यामुळे मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात सुलभ होईल, असं आवाहन गोयल यांनी केलं आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग  रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर देशातील सर्व दळणवळण व्यवस्था , रहदारी बंद करण्यात आल्याने स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत.  माध्यमांनी मोठ्या प्रमाणात हे चित्र सरकारसमोर मांडल्यानंतर या मजुरांसाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरु केल्या खऱ्या परंतु त्या कमी पडत आहेत. त्यामुळे आता १ जून पासून दररोज २०० ट्रेन्स वेळापत्रकाप्रमाणे धावतील असं केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान राज्य सरकारांनाही पियूष गोयल यांनी एक आवाहन केलं आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मजुरांना सहकार्य करावं. त्यांच्या जवळ असलेल्या मेनलाइन स्टेशनजवळ नोंदणी सुरु करावी. त्याची यादी रेल्वे अधिकाऱ्यांकडे द्यावी. जेणेकरुन त्यानुसार रेल्वे श्रमिक स्पेशल ट्रेन चालवू शकेल. तसंच जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना आपल्या घरी लवकरच जाता येईल. त्यांनी काळजी करु नये असंही पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!