AurangabadNewsUpdate : औरंगाबादहून परराज्यातील 15 हजार मजूर रेल्वेने स्वगृही रवाना

Advertisements
Advertisements
Spread the love

…तर बसने 3500 मजूर राज्याच्या सिमेवर पोहचवले

कोरोना ससंर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे जिल्ह्यात अनेक परराज्यातील मजूर, परप्रांतीयाना आपल्या गावी जाणे शक्य नव्हते. त्यांना आपल्या स्वगृही जाण्यासाठी शासनाने काही अटी नियमांच्या अधीन परवानगी देऊन जिल्हा प्रशासनामार्फत त्या लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिले.त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातून मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार राज्यातील मजूरांना रेल्वे सुविधा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या रेल्वे सुविधेची सुरुवात सात मे रोजी भोपाळ साठी पहिल्या रेल्वेने झाली.त्यानंतर आठ मे जबलपूर तर नऊ मे रोजी खांडवा,मध्यप्रदेशसाठीच्या रेल्वे रवाना झाल्या. मध्य प्रदेश शासनाने मध्यप्रदेश मजुरांच्या प्रवासाचा खर्च भरलेला आहे . सर्वसाधारणपणे मध्यप्रदेश मध्ये साडेतीन हजार मजुरांना रेल्वेद्वारे पोहोचवण्यात आलेले आहे.
औरंगाबादहून उत्तर प्रदेश मधील 8000 मजुरांना आपल्या स्वगृही पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खर्च करून या मजूरांना उत्तर प्रदेश मध्ये जाण्यासाठी मदत केली आहे.त्यांतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून तेरा मे रोजी औरंगाबाद ते बालिया आणि औरंगाबाद ते गोरखपूर या दोन रेल्वे पाठविण्यात आल्या.तर चौदा मे रोजी औरंगाबाद ते उन्नाव आणि औरंगाबाद ते आग्रा या दोन ठिकाणांसाठी तर सोळा मे रोजी औरंगाबाद ते लखनौ या रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत.झारखंडसाठी १९ मे रोजी औरंगाबाद ते डालटन गंज या ठिकाणासाठी रेल्वे सोडण्यात आली.
औरंगाबादहून जाणाऱ्या सर्व मजूरांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे . तसेच सर्व मजुरांना मास्क व अन्नाची पाकीटे व पाण्याची बाटली रेल्वे स्टेशनवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून येत्या २२ मे रोजी बिहारच्या अॅरीयासाठी तर २३ मे रोजी मुझ्जफरपूर साठी रेल्वे रवाना होणार आहेत. बिहार व झारखंड येथील मजुरांचा प्रवासखर्च जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे.सर्वसाधारणपणे साडेतीन हजार मजूर रेल्वेद्वारे प्रवास करतील,अशी माहिती अप्पासाहेब शिंदे ,उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी यांनी दिली.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ज्ञानोबा बानापुरे ,उपविभागीय अधिकारी औरंगाबाद, किशोर देशमुख, अप्पर तहसीलदार,औरंगाबाद , कृष्णा कानगुले तहसीलदार, औरंगाबाद व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या सर्व टीमने ही कार्यवाही मुदतीत यशस्वीरित्या पार पाडत आहेत.

Advertisements

पोलीस प्रशासनाचा विशेष सक्रिय सहभाग

परराज्यातील जिल्ह्या बाहेरील व्यक्तिंना आपापल्या गावी सोडण्यासाठीच्या उपक्रमात जिल्हा प्रशासनाला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस यंत्रणा भरीव योगदान देत आहे.
पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांचे सुचनेनुसार पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्रातील विविध जिल्हयात/राज्यात जाण्यासाठी ऑन लाईन परवानगी देण्यास सुरुवात केली. यामुळे लोकांना घरबसल्या परवानगी मिळण्याचा मार्ग सोयीस्कर झाला.
पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील सर्व पोलीस ठाणे येथील विशेष शाखेतील कर्मचारी यांच्याकडुन परराज्यातील मजुरांच्या नावांची यादी मागविण्यात आली. आलेल्या माहितीचे एकत्रीकरण करुन नऊ हजार मजुरांची यादी तयार केली. या यादीचे (22) राज्याप्रमाणे वर्गीकरण करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. रेल्वे वेळपत्रकानुसार रेल्वे स्टेशन येथे बंदोबस्त नेमण्यात आला. तसेच प्रवासी मजुरांना रेल्वेस्टेशन येथे रेल्वेच्या वेळपत्रकानुसार पोहचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली.

Advertisements
Advertisements

वैद्यकीय पथकामार्फत मजुराची वैद्यकीय तपासणी केली.

पोलीस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वात ग्रामीण पोलीसांनी बाहेर गावातील, परराज्यातील मजूर, परप्रांतीय लोकांना निवारा कक्षात ठेवून त्यांच्या राहण्याची , जेवण्याची व्यवस्था केली. तसेच जिल्ह्यातून बाहेर पायी चालत निघालेल्या लोकांना समजावून निवारा कक्षात आणणे, प्रवास साधनांची सोय होईपर्यंत या लोकांची व्यवस्थित काळजी घेणे, त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या परगावातील घरच्या लोकांसोबत व्हीडिओ कॉलद्वारे बोलणे करून देणे जेणेकरून त्यांना मानसिक आधार मिळेल याची खबरदारी ग्रामीण पोलीस यंत्रणेने घेतली.तसेच निवारा कक्षातील बाहेर गावच्या प्रवास परवानगी मिळालेल्यांना रेल्वे स्टेशनवर पोहचवण्यासाठी वाहन व्यवस्था ही ग्रामीण पोलीसांनी केली.
रेल्वे प्रमाणे शासनाने परराज्यातील मजुरांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बसने राज्याच्या सिमे पर्यंत मोफत सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली मिना मकवाना, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांनी औरंगाबाद येथील म.रा.प.मं. चे विभाग नियंत्रक अमोल आहिरे तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी माने यांचेशी संपर्क करुन तसेच समन्वय साधुन औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीतील राज्या बाहेर जाणा-या मजुरांना बस सेवा उपलब्ध करुन दिली. आता पर्यंत 171 बसेस व्दारे 3500 मजुर लोकांना त्याच्या राज्या लगतच्या महाराष्ट्रच्या सिमेवर रवाना केले.

Leave a Reply

आपलं सरकार