AurangabadNewsUpdate : साळे आणि प्रधान गॅंगवार, चौघे अटकेत, एम.वाळूज पोलिसांची कामगिरी

Advertisements
Advertisements
Spread the love

अटक आरोपी १) करण साळे २)विकास गायकवाड ३) जितेंद्र दहातोंडे ४) विशाल फाटे उर्फ मड्या

Advertisements

औरंगाबाद -दोन दिवसांपूर्वी १७ मे रोजी योगेश प्रधान (३२) याला वडगाव कोल्हाटीच्या अण्णाभाऊ साठे चौकात बोलावून खून केल्या प्रकरणी एम.वाळूज पोलिसांनी चारही आरोपी खवड्या डोंगर परिसरातून आज पहाटे सहा वाजता अटक केले. त्यांना कोर्टाने २३ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
विकास सुरेश गायकवाड,जितेंद्र दहातोंडे,विशाल उर्फ किशोर फाटे(मड्या) आणि करण कल्याण साळे सर्व रा.वडगाव कोल्हाटी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मयत योगेश प्रधान ने साळे गॅंगच्या छौटू दहातोंडेवर गेल्यावर्षी ७ सप्टेंबरला पोटात आणि खांद्यावर चाकूचे वार करुन फरार झाला होता.त्यामुळे योगेश प्रधानचा काटा काढायचा हे आरोपी वर्षभराभरापासून प्लान करंत होते.व त्यांनी १७ मे रोजी  योगेश प्रधानला संपवले.
२००१ साला पासून प्रधान आणि साळे गॅंगमधे गॅंगवार सुरु आहे.कल्याण साळे या प्रतिष्ठित नागरिकाचा प्रधान गॅंगने खून केल्यानंतर साळे गॅंगने प्रधानवस्ती पेटवून दिली होती.तेंव्हा पासून या दोन्ही गॅंग परस्पर खूनाचे सत्र सुरु ठेवतात.तसेच वरिल आरोपीपैकी जितू दहातोंडेने २००२साली कुख्यात संजय भादवेचे मुंडके कापून धड मड्याच्या विहीरीत फेकून दिले मयत संजय भादवे याचे आरोपी दहातोंडेच्या बहीणीशी प्रेमप्रकरण असल्याचा सुगावा दहातोंडेला लागला होता. मयत संजय भादवे याने गुरु गणेशनगरात संपतमुनीचा सुपारी घेऊन खून केला होता. तसेच प्रकाश मेजरचा हात कल्याण साळे मर्डर प्रकरणात असल्याचा निरोप प्रधान गॅॅंगने साळे गॅंगला पोहोचवला होता.त्यामुळे साळे गॅंगने प्रकाश मेजरचाही काटा काढला होता. त्या गुन्ह्यात विशाल फाटे ऊर्फ मड्या अवघ् १७ वर्षाचा हौता.जितेंद्र दहातोंडे, राजू दहातोंडे यांच्याकडून मड्याने पक्की तालीम घेऊन एम वाळूज परिसरात दहशत बसवली आहे.
वरील प्रकरणात पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी कामगिरी पार पाडली. त्यांच्या सोबत पीएसआय राजेंद्र बांगर, एसआय रामदास गाडेकर, पोलिस कर्मचारी वसंत शेळके,फकीरचंद फडे, बाबासाहब काकडे यांनी सहभाग घेतला होता.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार