Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : ऑनलाईन फसवणूकीतील २ लाख ४६ हजारांची रक्कम तक्रारदारांना परत

Spread the love

सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामिण कार्यालयामार्फत  ऑनलाईन फसवणूकीतील २ लाख ४६ हजार ४१० रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यात  आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी  औरंगाबाद ग्रामिण यांनी प्रसिद्धीपत्राद्वार दिली आहे.

सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामिण यांच्या कार्यालयाकडे  दि.१ मार्च २०२० ते आजपर्यंत औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या एटीएम,केडिट कार्ड तसेच ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारातील प्राप्त तक्रारींमध्ये सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामिण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी १५ तक्रारदारांची २४६४१० रुपयांची रक्कम तक्रारदारास परत मिळवून दिली आहे.यामध्ये एटीएम,क्रेडीट कार्ड व ओटीपीची माहिती व युपीआय लिंक शेअर केल्याने फसवणूक झाली होती.
नागरिकांनी आपले एटीएम, क्रेडिट कार्ड व ओटीपी क्रमांकाची माहिती कोणालाही सांगू नये.कुठल्याही लिंक शेअर करुन नये तसेच कुठल्याही कॅशबॅक सारख्या आमिषाला बळी पडू नये.असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण येथे संपर्क करावा,असे आवाहन मोक्षदा पाटील,पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण, यांनी केले आहे.
सदरील  कामगिरी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक घुगे, पोलीस उपनिरिक्षक विवेक जाधव, यांच्यासह सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामिण कार्यालयाच्या पथकामार्फत  करण्यात आली असल्याचे जनसंपर्क अधिकारी,औरंगाबाद ग्रामिण यांनी प्रसिद्धीपत्राद्वार कळविले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!