Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusWorld : चीन आणि दक्षिण कोरियात जनजीवन मूळ पदावर येत असतानाच आली हि भयानक बातमी ….

Spread the love

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असल्याचे सांगण्यात येत असले तरी  प्रारंभीचे तीन महिने या देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती नंतर ती कमी झाली. या देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र चीन आणि दक्षिण कोरियात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसात हा उद्रेक होऊ शकतो अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार चीनच्या एका शहरात शुक्रवारी ८ हजार लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तर काही शहरांमध्येही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकांची इम्युनिटी किती प्रमाण वाढली यावर बऱ्याच गोष्टी अवंलबून असल्याचं त्यांच मत आहे. तर दक्षिण कोरियातही शाळा आणि कॉलेजेस पूर्व पदावर येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे लोक बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत नव्याने रुग्णांची संख्या वाढू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या आरोपानुसार कोरोना व्हायरस चीनच्या लॅबोरेट्रीमध्ये तयार करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यामुळे चीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान  एका आरोग्य अधिकाऱ्यानं केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. चीननं कोरोनाचे विषाणूचे सुरुवातीचे काही नमुने नष्ट केल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरण्याच्या भीतीनं तज्ज्ञ आणि संशोधनानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. अमेरिकेनं कोरोनावरून चीनला चांगलंच धारेवर धरलं आहे. कोरोना व्हायरस कसा पसरला आणि पहिल्यांदा समजल्यानंतर रोखण्यासाठी का प्रयत्न केला नाही असा सवालही विचारण्यात आला. देशाचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी यापूर्वी असा आरोप केला आहे की जागतिक महामारीच्या बाबतीत देशातील कम्युनिस्ट पक्ष आंतरराष्ट्रीय पारदर्शकतेखाली आहे. चीनने व्हायरसचे नमुने नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!