Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : औरंगाबाद ग्राउंड झिरो रिपोर्ट : “ऑफिशियली “लॉकडाउन १०० टक्के पण कडक कर्फ्यूतही सर्व काही चालू आहे शहरात … औरंगाबादकर सुधरायला तयार नाहीत …..

Spread the love

औरंगाबाद शहरात १०० टक्के लॉकडाऊन कागदावरील आदेशाप्रमाणे चालू असले तरी सर्व काही सुरळीत चालू आहे . विभागीय आयुक्तांनी काही अत्यावश्यक सेवांच्या पासेस वगळता सर्व पस रद्द केल्या असल्या तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काही लोक जुन्या पास लावून तर काही लोक विना पास बिनधास्त आणि निर्लज्जपणे फिरताना दिसत आहेत. लोकांचे मॉर्निंग / इव्हनिंग वॉक चालू आहेत . मुख्य रस्त्यावरील दुकानांचे शटर बंद असले तरी अनेक वस्त्यांमधील बेकऱ्या ,  मटण , चिकन सर्व प्रकारची दुकाने चालू आहेत आणि लोकांची खरेदीही चालू आहे. भाजीपाला प्रचंड दराने विकला जात आहे. याला कसे रोखणार हा मोठा प्रश्न आहे .


औरंगाबाद शहरात १०० टक्के लॉकडाऊन  आणि कडक कर्फ्यू चालू असतानाही कोरोनाग्रस्तांची संख्या १०२१ वर गेला असल्याने चिंता व्यक्त केली  जात आहे. या विषयी महानायक ऑनलाईनच्या माहितीनुसार शहरात कुठेही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्यामुळे औरंगाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान औरंगाबाद शहरात आधी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सम – विषम दिवसांची रचना करून लोकांना सम दिवशी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ दिला होता परंतु काही लोक या सवलतीचा गैरफायदा घेऊन गर्दी करीत असल्याने कोरोना वाढीसाठी शहरात पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे लक्षात येताच विभागीय आयुक्तांनाही स्वतः पुढाकार घेऊन शहरात १४ मे च्या मध्य रात्रीपासून आधी १७ तारखेपर्यंत आणि आता २० तारखेपर्यंत हा कर्फ्यू वाढवला आहे. पुन्हा सुधारित आदेश काढून त्यात म्हटले आहे कि ,  दरम्यानच्या काळात कोरोना पॉझिटिव्हची संख्या कमी झाली नाही तर २४ मे पर्यंत कर्फ्यू वाढविण्यात येणार असून केवळ सकाळी ७ ते ११ अशी चार तासांची सवलत देण्यात येईल. प्रशासनाच्या या नियमांमुळे जे लोक लॉक डाऊनच्या नियमांचे पालन करतात त्यांच्यावर तर हा अन्यायच आहे . प्रशासनाने २० मे पर्यंत लॉकडाऊन अधिक कडक करावे मात्र दरम्यान काही तासांची सूट नागरीकांसाठी द्यावी अशी मागणी होत आहे.

नियमांचे पालन होत नाही….

प्रारंभीच्या काळात औरंगाबाद सर्व काही सुरळीत चालू होते शहरात आढळून आलेला पहिला रुग्णही ठणठणीत बारा झालेला होता परंतु पुढे पुणे , मुंबई आणि विदेश वारीवरून शहरातील काही नागरिक आणि पाहुणे औरंगाबादेत आले आणि औरंगाबाद शहराचे आरोग्य धोक्यात आले. एकमेकांच्या संपर्काने रुग्ण वाढत गेले. गेल्या काही दिवसात रुग्णांचा गुणाकार होत असतानाही मध्येच रमझानचा महिना सुरु असल्याने मुस्लिम नागरिकांची अधिकच तारांबळ उडाली आणि शहर दृश्य स्वरूपात बंद झाले . परंतु शहरातील सर्व व्यवहार लपून छपून चालूच आहेत पोलिसांच्या मेहेरबानीशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे .

शहरातील पोलीस पोलीस बंदोबस्ताचा आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला असता  शहराच्या अनेक वस्त्यांमधून लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नाही. सध्या शहरात कडक कर्फ्यू चालू असला तरी सर्वत्र वस्त्यांमध्ये चिकन , मटण , मासे , दूध , भाजी पाला , किराणा, दारू , गुटखा , तंबाखू लपून छपून विकला जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्याकडेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे  लक्ष नाही. याकडे पोलीस आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक वस्त्यांमध्ये पहाटे ५ ते सकाळी ८ च्या आत हा सर्व माल विकला जातो. या वेळेत कुठलेही पोलीस वस्त्यांमध्ये जात नाहीत.

माहितीचा अभाव…

औरंगाबाद शहरातील सर्वच अधिकाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमांना योग्य ती माहिती देण्याचे वावडे असल्याचे दिसून येत आहे.  काल तर याचा धक्कादायक अनुभव महानायक ऑनलाईनला आला. शहरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या किती या प्रश्नाचे उत्तरही उपायुक्त     दरम्यानच्या काळात महापालिका अस्तित्वात असताना महापौर नंदकुमार घोडेले स्वतः फेसबुक लाईव्ह वरून शहराची अधिकृत माहिती शेअर करीत होते परंतु ते गेल्यानंतर काही दिवस अधून मधून हि माहिती मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली , पुढे एक दोन वेळेस मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिली पुढे पुन्हा यात खंड पडला. दरम्यान महापालिका प्रशुद्धी अधिकर्त्यांनी कळविले कि , त्यांच्याकडून माहिती देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली असून संबंधित उपजिल्हाधिकारी श्रीमती मेत्रेवार यांच्याशी संपर्क साधावा . त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि , जिल्हा माहिती अधिकारीच माहिती देतील. मुळात हि टोलवाटोलवी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून का होते आहे हे समजायला मार्ग नाही. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुंदर कुलकर्णी , डॉ . प्रदीप कुलकर्णी , घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडूनही व्यक्तिशः माहिती दिली जाते . दरम्यान आता मात्र तक्रारी केल्यानंतर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांच्या सोयीनुसार दिली जात आहे. यामध्ये लोकांना चुकीची माहिती जाऊ नये म्हणून अधिकाऱ्यांमध्ये सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.

औरंगाबादकरांचा हलगर्जीपणा आणि पोलीस

औरंगाबाद शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना याला औरंगाबादकर नागरिकांचा हलगर्जीपणा तर कारणीभूत आहेच शिवाय शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असलेला सुसंवादाचा अभाव आणि पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचा अनुभव स्वतः विभागीय उपयुक्त शिवानंद टाकसाळे यांना संत नगर या हॉट स्पॉट असलेल्या भागात आला. प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र म्हणून ते या भागाची फणी करीत असताना त्यांना दिसून आले कि , पोलिसांच्या समक्षसुद्धा कोणीही सोशल डीस्टंसिंगचे पालन करीत नाही. सगळीकडे लोक फिरत आहेत. महिला गप्पा मारत आहेत , मुले खेळत आहेत आणि त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

विभागीय आयुक्तांचा पुढाकार…

शहराच्या इतर भागातही अशीच अवस्था आहे. शहर आयुक्तांच्या नियंत्रणातून शहर गेल्यामुळे कि काय ? पहिल्यांदा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः च्या अधिकारात आधी १७ तारखेपर्यंत आणि नंतर २० आणि पुढे २४ तारखेपर्यंत कडक कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. वास्तविक आतापर्यंत शहरातील सर्व आदेश पोलीस आयुक्तांच्या सहीने आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशाने निघालेले आहेत परंतु यावेळी केंद्रेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला असला तरी यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. दरम्यानच्या काळात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडे आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शहराच्या विविध भागात लोकांचे प्रबोधन केले यामध्ये विभागीय आयुक्तांना किंवा त्यांच्या उपायुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना कुठेही सोबत घेतले नाही. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि जिल्हा महसूल , प्रशासनातील अधिकारी यांच्यात कुठलाही समन्वय दिसून येतनाही. याबाबत महानायक ऑनलाईन हि बाब आणि जिल्हा प्रशासनातील विस्कळीतपणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीबाबत योग्य ते आदेश दिले.

जाता जाता….औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद असोत , विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर असोत , जिल्हाधिकारी उदय चौधरी असोत कि मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडे असोत,  प्रत्येकाची भूमिका आणि धडपड शहराला ग्रीन झोनमध्ये आणण्याची असली तरी जोपर्यंत औरंगाबादकर त्यांनी घेतलेल्या निर्णयाची जोपर्यंत काटेकोरपणे पालन करणार नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाही. यासाठी आमच्या मते सर्वात महत्वाचे हे आहे कि , सर्व प्रथम पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज आहे. कारण शहरातील सर्व व्यवहार लपून छपून चालण्यामागे त्यांचा मोठा हात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!