Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : जाणून घ्या किती लोकांनी घेतली ऑनलाईन दारू , वाईन शॉप समोरील ड्युटीमुळे दोन पोलिसांना कोरोना…

Spread the love

मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप समोर तैनात केलेल्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  कोणत्याची प्रकारची सुरक्षेची उपाय योजना तिथे करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना लागण झाल्याचे  सांगण्यात येत आहे. यात एक पोलीस उपनिरीक्षक तर एक पोलीस कर्मचारी आहे. हे दोघही जण मुंबईतले आहेत. काही आठवड्यांपूर्वीच सरकारने दारुच्या दुकानांना उघडण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ऑनलाईन घरपोच सेवाही सुरू करण्यात आली होती. सध्या  मुंबईत १ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस आघाडीवर परिस्थिती सांभाळत लढत आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून शनिवारपासून सकाळी १० वाजल्यानंतर घरपोच दारु पोहोचविण्यात आली. पहिल्या दिवशी राज्यातील ८,६२८ ग्राहकांना घरपोच दारू देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार ही परवानगी दिली आहे. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी  करण्यात येत आहे. राज्यात २४ मार्च २०२० पासुन लॉकडाऊन सुरु आहे. शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी  गेल्या ४८ तासांमध्ये राज्यात ११९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ६३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात अप्पर  जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच लावला ट्रॅप

दरम्यान बीड जिल्ह्याच्या सीमेवरील चेक पोस्टवर इतर जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांकडून पोलिस लाच  घेऊन त्यांना अनधिकृत प्रवेश देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे खुद्द अप्पर पोलिस अधीक्षकांनी स्टिंग ऑपरेशन करून पोलिस विभागातील लाचखोरीचा पर्दाफाश केला आहे. जिल्ह्याच्या हद्दीत तपासणी नाक्यावर पोलिस काही नागरिकांना विनापरवानगी प्रवेश देत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले. तपासणीत नाक्यांवरील ३ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.

काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याचा परवाना नसला तरी पोलिस लाच घेऊन अनेकांना अनधिकृत प्रवेश देत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बीडचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी तपासणी नाक्यांवर डमी प्रवासी पाठवून या तक्रारींचे स्टिंग केलं. या डमी प्रवाशांला जिल्ह्यात येण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकारात तीन पोलिस कर्मचारी दोषी आढळून आले. या प्रकरणाची गंभीर दखर घेऊन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी एम.के.बाहिरवाल, डी.बी. गुरसाळे, एस.बी.उगले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे,

आपलं सरकार

Click to listen highlighted text!