Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadLatestUpdate : धक्कादायक : घाटीत आणखी 74 वर्षीय कोरोनाबाधिताचा चौथा मृत्यू , एकूण मृत्यूची संख्या ३० वर तर रुग्णांची संख्या ९५८

Spread the love

औरंगाबाद :  शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रौफ कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत 30 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. सदरील रुग्ण 15 मे रोजी घाटीत भरती झाले होते. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवले होते. त्यांच्यावर घाटीच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा आज सकाळी 9.15 वाजता मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आजारही होता, असेही कळवले आहे.

दरम्यान एकीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे  255 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सगळे उपाय प्रशासनाने केले मात्र, ही साखळी खंडित होऊ शकली नाही. आतापर्यंत शहरात 100 टक्के लॉकडाउनचा पर्याय प्रशासन वापरला होता. यामध्ये फक्त दवाखाने आणि औषध विक्रीच सुरू आहे. परंतु, तरीही नागरिकांचा वावर रस्त्यावर दिसतच आहे. अखेर पोलिसांनीही औरंगाबादकरांपुढे हात टेकले आहे. आता शहराच्या बंदोबस्तात जलद कृती दल रस्त्यावर उतरवले आहे. शहरातील ज्या भागात कोरोना पोझिटिव्ह रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्या भागात आज जलद कृती दलाने संचलन केले आहे. आता घराबाहेर विनाकारण कुणी बाहेर आढळून आलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश जलद कृती दलाला देण्यात आले आहेत.

कन्नड तालुक्यातील देवळाणा येथेही करोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९५८ झाली आहे, तर आतापर्यंत २७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५५ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देवळाणा येथील करोना रुग्णांच्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात येणार असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ आता  औरंगाबाद शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1000 टप्पा गाठणार अशी भीती वर्तवली जात आहे. तर मागील 14 तासात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज सकाळी औरंगाबाद शहरात 57 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 958 वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.  तसंच शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मागील 14 तासांमध्ये दोन महिला आणि एक पुरूष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित असलेल्या 35 वर्षीय महिलेचा आज सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसंच संजय नगरातील 52 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा 16 मे रोजी सायंकाळी 7 वाजून 45 ‍मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता. तर जलाल कॉलनी येथील 32 वर्षीय पुरूष रुग्णाचा 16 मे रोजी रात्री 9 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरात आज 57 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

सकाळी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात आज  जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी  (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2)  तर  कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागात वरील कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!