Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PM CareFund : हिशेब मागताय ? घ्या : ३१०० कोटींचं वाटप झालंय, मजुरांवर १००० कोटी खर्च करायचे आहेत आणि या गोष्टींचे नियोजन आहे…

Spread the love

पंतप्रधानांनी नव्याने सुरु केलेल्या फंडातील रक्कमेचं  काय झालं ? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान कार्यालयाने उत्तर देताना म्हटले आहे कि , कोरोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचं वाटप करण्यात आलं आहे.  महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्थलांतरित मजुरांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्थलांतरित मजुरांसाठी १००० कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.

असं आहे पुढील  नियोजन

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, करोनाशी लढा देण्यासाठी पीएम केअर फंडकडून ३१०० कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. यामधील २००० कोटी रुपये व्हेटिलेटरची खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे. तर १००० कोटी रुपये स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्यासाठी वापरले जाणार आहे. तर उर्वरित १०० कोटी रुपये लसनिर्मिती करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाविरोधात लढण्यासाठी PM-Cares फंडची निर्मिती केली होती. यावेळी त्यांनी लोकांना पीएम केअर फंडसाठी मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी ट्विट करत सांगितलं होतं की, “देशभरातील लोकांनी करोनविरोधीत लढाईत मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही भावना लक्षात घेता पीएम केअर फंडची निर्मिती केली आहे. निरोगी भारताची निर्माण करण्यात हे महत्त्वाची भूमिका बजावेल”.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!