देशी भारतीय प्रवाशांची रेल्वे बुकिंग ३० जूनपर्यंत रद्द , तिकिटाचे पैसे परत , दोन महिन्यानंतरही अनेकांना त्यांच्या घरी परतण्याची सुविधा नाहीच…!!

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतातील देशी  प्रवाशांसाठी सुरु करण्यात आलेले बुकिंग पुन्हा एकदा भारतीय रेल्वेने थांबवले असून येत्या ३० जूनपर्यंत बुकिंग केलेल्या सर्व तिकिटांचे  बुकिंग भारतीय रेल्वेकडून रद्द करण्यात आले आहे. या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत करण्यात येत आहेत. या दरम्यान, रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहतील. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७ मेनंतर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होणार असल्याचे  आपल्या संबोधनातून सांगितलं होते . या लॉकडाऊनमध्ये काही नवीन नियमही असतील. त्याबद्दल लवकरच केंद्राकडून दिशानिर्देशही जाहीर केले जाणार आहेत. परंतु, आता रेल्वेनं थेट ३० जूनपर्यंत प्रवासी तिकिटांचं बुकिंग रद्द केल्यानं लॉकडाऊन नेमकं कधीपर्यंत सुरू राहणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Advertisements

दरम्यान देशातील १५ शहरातील ३० वातानुकूलित गाड्या मात्र नियोजित वेळेत धावणार आहेत मात्र याचा लाभ या रेल्वेगाड्यांचे तिकीट दर परवडणारे नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मोठी दैना होत असून सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही याउलट विदेशातील हजारो लोकांना केंद्र सरकार विशेष विमानांनी भारतात त्यांना आपापल्या घरी पोहोचवत आहे. सर्वसामान्य लोकांकडे सरकार केंव्हा लक्ष देणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार