Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Maharashtra Update : राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल केंद्राकडे वीस कंपनीची मागणी -गृहमंत्री अनिल देशमुख

Spread the love

राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनमुळं राज्यातील पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) २० कंपन्या पाठवण्याची मागणी केंद्र सरकारकडं केली आहे. गेले जवळपास दोन महिने राज्यातील पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. लॉकडाऊनचे नियम कठोरपणे राबवण्याची जबाबदारी सांभाळतानाच पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेकडंही लक्ष द्यावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यातच राज्यात एक हजारांहून अधिक पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करोनामुक्त झालेल्या पोलिसांना काही दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. शिवाय, अनेक पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. सध्या रमजानचा सणही सुरू आहे. अशा स्थितीत कायदा-सुव्यवस्था राखण्याचंही आव्हान आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं केंद्राची मदत मागितली आहे. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारनं २० तुकड्यांची म्हणजेच, किमान २ हजार जवान पाठवण्याची मागणी केंद्राकडं केली आहे. राज्यात सध्या राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल काम करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!