Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : धक्कादायक : मालेगाव पालिकेच्या आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना कोरोना….

Spread the love

राज्यात सर्वत्र कोरोनाचा जोर वाढतच असून मालेगाव शहरातील कोरोनाचा संसर्गही थांबायला तयार नाही . दरम्यान साथीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दुसऱ्यांदा मालेगाव दौऱ्यावर आले होते. दुपारी शासकीय विश्रामगृहावर करोना परिस्थितीबाबत मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असतानाच मालेगाव महानगरपालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह मंत्र्यांना देखील धक्का बसला आहे.  मालेगावातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आयुक्तांची येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीला एक महिना देखील पूर्ण होत नाही तोच त्यांना करोनाची लागण झाली आहे.

आज बुधवारी आरोग्यमंत्री टोपे मालेगावी दाखल होत असल्याने शासकीय विश्रामगृहावर स्वतः कृषिमंत्री दादा भुसे, माजी आमदार आसिफ शेख, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल या लोकप्रतिनिधींसह सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी येथे उपस्थित होते. टोपे दाखल होताच बैठकीला सुरुवात झाली. त्यावेळी खरे तर कुणीही कल्पना केली नसेल की आपल्या शेजारी बसलेले आयुक्त देखील करोना पॉझिटिव्ह येऊ शकतात. खुल्या मैदानात शारीरिक अंतर ठेऊन बैठकीचा पहिला टप्पा पार पडला. इतक्यात आयुक्तांना कुणीतरी निरोप दिला आणि ते या बैठकीतून निघून गेले.

आरोग्य मंत्री महोदयांनाही माहिती नव्हती…

दरम्यान, बैठाकीचा दुसरा टप्पा शासकीय विश्रामगृहातील सभागृहात सुरू होताच पालिका आयुक्तांची अनुपस्थिती अनेकांच्या नजरेतून सुटली नाही. अखेर स्वतः मंत्री महोदयांनीच ‘आयुक्त कुठे आहेत?’ अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जावे लागल्याचे उघड झाले. यावेळी सगळ्यांच मोठा धक्का बसला. सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त झाले. अखेर मंत्र्यांनी ‘त्यांना काळजी घ्यायला सांगा’ असा उपस्थित अधिकाऱ्यांकरवी निरोप देत उर्वरित कामकाज पूर्ण केले. शहरात करोनाची स्थिती विपरीत होत असताना प्रतिकूल काळात आयुक्तांनी पदभार स्वीकारला होता. ते सातत्याने बैठका, दौरे, भेटीगाठी करीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री भुसे यांच्यासमवेत करोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला होता. बुधवारी त्यांचाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिका प्रशासन हादरले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना देखील संक्रमणाची भीती व्यक्त होते आहे. आयुक्तांची लक्षणे सौम्य असून त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!