Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : जाणून घ्या पुणे , मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या आणि परिस्थिती

Spread the love

मुंबईत आज झालेल्या मृत्यूंपैकी १७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये १७ पुरुष आणि ११ महिला रुग्ण होत्या. ४ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. तर दहा रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. उर्वरित १४ रुग्ण ४० ते ६० वर्षे वयोगटातील होते, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. मुंबईत आज दिवसभरात २८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४२६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १४,७८१ वर पोहोचली आहे.

आज राज्यात ५३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या आता ९२१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील २८, पुण्यातील ६, पनवेलमधील ६, जळगावमधील ५, सोलापूर शहरातील ३, ठाण्यातील २, रायगडमधील १, औरंगाबाद शहरातील १ आणि अकोला शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. ५३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. एकूण १२ हजार ९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. दरम्यान मुंबईतील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता १४, ७८१ झाला आहे. आज दिवसभरात ४२६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृतांची एकूण संख्या आता ५५६ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये १७ पुरुष आणि ११ महिला रुग्ण होत्या. ४ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. तर दहा रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. उर्वरित १४ रुग्ण ४० ते ६० वर्षे वयोगटातील होते, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली. राज्यात मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा तीन हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळं चिंता अधिकच वाढली आहे.

पुणे शहरात २७००हुन अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त 

पुणे जिल्ह्यातील आणखी १३६ जण करोनाबाधित असल्याचं सोमवारी रात्री उशिरा आलेल्या चाचणी अहवालानंतर स्पष्ट झालं. त्यामुळं जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. ही माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी २७०० हून अधिक झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये १७३, तर ग्रामीण भागासह प्रतिबंधित क्षेत्रातील २३२ जण करोनाबाधित आहेत, असंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळं १६० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.

रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील खासगी रुग्णालयांत सात रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांच्या संख्येबरोबरच बाधित रुग्णसंख्येचीही उच्चांकी नोंद झाली आहे. पुणे शहरात नवीन १६५ रुग्ण आढळले. १०७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने करोनाची भीती वाढू लागली आहे. दहा दिवसांनंतर लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी पाठवण्याबाबत नवीन नियम लागू झाला असून, त्यानुसार १२० जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!