Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आत्मनिर्भर भारत : गृहमंत्री अमित शहा लागले कामाला …म्हणाले स्वदेशीवर देणार भर

Spread the love

काल मंगळवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत असताना आत्मनिर्भर भारताची संकल्पना जाहीर करताना  स्वदेशा उत्पादनांवर जास्त भर देण्याचे आवाहन लोकांना केले होते. यासाठी मोदींनी Vocal for Local हे सांगत लोकानां स्वदेशी वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करण्यास सांगितले. मोदींच्या या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली. अतिम शहा यांनी ट्वीट करत असे सांगितले ती, सर्व केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. हा निर्णय 1 जूनपासून अंमलात आणला जाणार आहे. यामुळे 10 लाख केंद्रीय अर्धसैनिक दलातील सुमारे 50 लाख कुटुंबे केवळ 2800 कोटी रुपयांची देशी उत्पादने खरेदी करतील.

दरम्यान अमित शाह यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे कि ,  काल पंतप्रधानांनी देशाला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. लोकांना जास्तीत जास्त स्वदेशी वस्तुंचा वापर करण्यास सांगितले होते. यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात भारत जगाचे नेतृत्व करू शकेल, असे सांगत शाह यांनी केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. अशी घोषणा केली. यामुळं जवळजवळ 50 लाख कुटुंब स्वदेशी वस्तुंचा वापर करतील. अमित शाह यावेळी असेही म्हणाले की, देशातील बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करुन इतरांनीही तसे करण्यास प्रोत्साहित करावे असे मी आवाहन लोकांना करतो. प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!