शाब्बास सरकार !! आंतराष्ट्रीय विमानानाने देशात येणाऱ्या प्रवाशांसाठी देशांतर्गत विमानसेवाही सुरु करणार मोदी सरकार….

Advertisements
Advertisements
Spread the love

देशांतर्गत प्रवासी मजुरांचा प्रश्न कायम असताना , आंतराष्ट्रीय विमान सेवा आणि वातानुकिलत ३० खास रेल्वे गाड्यांबरोबरच देशात वेगवेगल्या ठिकाणी अडकलेल्या  श्रीमंत नागरिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत करण्यासाठी एअर इंडिया १९ मे ते २ जून दरम्यान विशेष देशांतर्गत विमान सेवा (डोमेस्टिक फ्लाईट) सुरू करणार आहे. यातील बहुतांश विमानं ही दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूहून उड्डाण घेतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

या नियोजनानुसार दिल्लीसाठी १७३, मुंबईसाठी ४०, हैदराबादसाठी २५, कोचीनसाठी १२ तर चेन्नईसाठी एक विमान असेल. चेन्नईसाठी १९ तारखेला हे विमान उड्डाण घेईल. मुंबईहून विशाखापट्टणम, कोचीन, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद आणि विजयवाडासाठी विशेष विमान असेल. दिल्लीहून असणारी विमानं जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ आणि इतर शहरांसाठी असतील. याशिवाय हैदराबाद ते मुंबई, दिल्ली तसंच बंगळुरू ते मुंबईसाठीही विमान असेल. दिल्ली ते हैदराबादसाठीही विमानसेवा एअर इंडियाकडून पुरवण्यात येणार आहे. याशिवाय भुवनेश्वरहूनन एक विमान बंगळुरूलाही उतरेल. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानांच्या उड्डाणांसाठी वेळापत्रकही तयार करण्यात आलंय. आता, केवळ नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अधिकृतरित्या परवानगी मिळणं बाकी आहे.

Advertisements
Advertisements

विशेष म्हणजे यातील बहुतेक विमानांची वेळ परदेशातून भारतात परतणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी असेल. परदेशातून मायदेशात दाखल होणाऱ्या नागरिकांना आपल्या राज्यात पोहचण्यासाठी या उड्डाणांचा वापर करता येईल. विमानात सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळावे लागतील. नोटिफिकेशन जारी करण्यात आल्यानंतर या विशेष देशांतर्गत विमानांसाठी एअरलाईनच्या वेबसाईटवरून तिकीट बुकींग करावं लागेल. ‘एअरपोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोमेस्टिक फ्लाईटस सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कारण, लवकरच खासगी विमान कंपन्यांना देशांतर्गत सेवा सुरू करण्याची परवानगी मिळू शकते.

आपलं सरकार