Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Maharashtra : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन …

Spread the love

राज्याचे नवे शैक्षणिक क्षेत्र ऑगस्टपासून सुरू व्हावं असं यूजीसीनं ठरवल्यामुळे परीक्षा आम्ही जुलै महिन्यात घेत आहोत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या बाबतीत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होत आहेत. २० जूनला आढावा घेत असताना आम्हाला असं आढळलं की या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला या परीक्षांमुळे धोका आहे. ते बाधित होऊ शकतात, तर आम्ही त्यावेळी विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ आणि या परीक्षांचा देखील फेरविचार करू. महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि भावनांशी खेळणार नाही, अशी ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली.  ते म्हणाले कि , महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, ज्याने तातडीने हालचाल करून २५ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वात आधी घेतला, उर्वरित ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांच्या पालकांनीही धीर धरावा, पॅनिक होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. यूजीसीला आम्ही ही सर्व परिस्थिती कळवणार आहोत. मात्र जोपर्यंत यूजीसीकडून कोणतीही स्पष्ट सूचना येत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेत, असं गृहित धरून घरी राहून शांतपणे अभ्यास करावा, असंही ते म्हणाले.

शासनाच्या निर्णयामुळे ३२ लाख विद्यार्थ्यांपैकी २५ लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. मात्र उर्वरित ७-८ लाख विद्यार्थी जे पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत, त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या बाबतीत २० जून रोजी आढावा घेण्यात येईल, याचा पुनरुच्चार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मात्र हा निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन सामंत यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने सामंत यांनी विद्यार्थ्यांशी फेसबुकवरून संवाद साधला. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील हे यूजीसीचं म्हणणं असल्यामुळे आम्ही परीक्षा घेत आहोत. अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत २० जूनला आढावा घेण्यात येणार आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, असंदेखील आमच्या निदर्शनास आलं आहे. पण मी या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हे सांगू इच्छितो की उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांच्या परीक्षा या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार होतात.

दरम्यान स्वायत्त विद्यापीठे तसेच खासगी विद्यापीठांच्या परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांना चिंता आहे. मात्र येत्या दोन दिवसांत या स्वायत्त विद्यापीठांच्या कुलगुरूंनादेखील महाराष्ट्र शासनाचं पत्र जाणार आहेत. त्यांनाही राज्य सरकारच्या आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच निर्णय घ्यावयाचे आहेत.  दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा व अन्य फी भरली आहे आणि ज्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचे काय अशी विचारणाही विद्यार्थ्यांनी यावेळी केली. यासंदर्भात सामंत म्हणाले की उद्या राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी बैठक होणार आहे, त्यावेळी परीक्षा शुल्काबाबतचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थी-पालकांच्या हिताचाच विचार यावेळी करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी निश्चित राहावे, असेही सामंत यावेळी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!